"मनसुखला पोलीस चौकशीच्या नावाने बसवून ठेवायचे"
“माझा नवरा चौकशीसाठी पोलीसांचा फोन आल्वर लगेच जायचा पण पोलीस त्याला पुर्ण दिवस बसवून ठेवायचे” असं मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी म्हटलं आहे.;
मुकेश अंबानिंच्या घराबाहेर स्पोटकांनी भरलेली गाडी आढळली. या गाडीचे मालक असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडल्याने विवीध चर्चांना सुरुवात झाली आहे. या संदर्भात मनसुख यांनी पत्नी विमला हिरेन यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली.
विमला हिरेन म्हणाल्या की, "मी असं काही होईल याचा कधी विचारही करु शकत नाही. आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. तशी पोलीसांत तक्रार केली होती. वेळोवेळी पोलिसांचा फोन येत होता. पोलिसांच्या सूचनेनुसार ते वेळोवेळी चौकशीसाठी जात होते. त्यांना पूर्ण दिवस बसवून ठेवले जायचे. माझ्या पतींनी या चौकशीला पूर्ण सहकार्य केले."
आता या प्रकरणाची कसुन चौकशी केली जावी अशी मागणी हिरेन कुटुंबीयांनी केली आहे.