आपल्यापैकी बरेच जण डायरी लिहत असतील. काही बऱ्याच दिवसांपासून किंवा अगदी नवीन वर्षाच्या सुरुवातीला डायरी लिहायला सुरुवात करायची असंही म्हणत असतील. काहींचं जुळलं तर काहींची डायरी आजही पेनाच्या शाईची रेघ उमटण्याची वाट पाहत असेल. पण आपल्यासाठी लॉकडाऊन ही एक नामी संधी आहे. तुम्ही डायरी लिहण्यास आजही सुरुवात करु शकता.
पण, सध्या तुमच्यासाठी घेऊन आलोय अमृताची डायरी. होय आपली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिची डायरी.. अमृताने आपले आयुष्यातील अनेक किस्से या डायरीत उतरवलेत आणि ती स्वत: ते वाचणार आहे. यानिमित्ताने तुम्ही तिच्या आयुष्यातील अनेक पैलू जाणून घेऊ शकता. पाहा अमृताच्या डायरीतले काही किस्से...
https://youtu.be/aYIZNk9UE9o