महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रियांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होते. बालविवाह ही महाराष्ट्रातील आणि भारतातील एक दुर्लक्षित असलेली परंतु अत्यंत गंभीर असलेली समस्या आहे. आजही भारतात होणाऱ्या एकूण विवाहांपैकी 40 टक्क्यांपेक्षा जास्त आणि महाराष्ट्रात होणाऱ्या विवाहांपैकी 30 टक्क्यांपेक्षा जास्त विवाह हे बालविवाह असतात.
आजही बालविवाह होणाऱ्या मुलींचे वय 12 ते 16 वयोगटात असते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एड. रंजना गवांदे यांनी महाराष्ट्र स्तरावर भटके-विमुक्त आणि इतर समाजातील बालविवाहांच्या संदर्भात भरीव काम करून हा विषय ऐरणीवर आणला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील बालविवाहाच्या संदर्भात होत असलेल्या या सकारात्मक कामाचा 'कॉमन मॅन'च्या नजरेतून हेरंब कुलकर्णी यांनी घेतलेला हा आढावा....
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/628803787696038/