शिवजयंतीच्या दिवशीच रायगडावर दारू पिऊन धिंगाणा
दारुड्यांना पोरींनी झेंड्याच्या काठीने फटकवलं;
शिवजयंतीच्या निमित्ताने काही तरुण हे किल्ले रायगडवर आले होते. पण त्यांनी यावेळी दारु पिऊन इथे गोंधळ घातल्याचा आरोप करत किल्ल्यावरील काही तरुण आणि तरुणींनी या तरुणांना चांगलाच चोप दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर असे अपमानकारक कृत्य खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही यावेळी या तरुणांना देण्यात आला आहे. तसेच जारु पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी या तरुणांविरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.