"शेतकरी उगवण्या सोबतच कापणं ही जाणतो"

आता लढाई आर पारची म्हणत प्रतिभा शिंदे यांचा सरकारला सुचक इशारा

Update: 2020-12-23 04:00 GMT

शेतकरी आंदोलनांचा मोर्चा मुंबईत जिल्हाधिकारी कचेरी व अंबानी कार्यालयावर निदर्शने करण्यासाठी ठाणे येथे आल्यावर ठाण्यातील मुलुंड चेक नाका येथे विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून आंदोलनकर्त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. शेतकरी आंदोलनाला ठाण्यातील जनतेचा पाठींबा, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा व कामगार विरोधी 4 कोड रद्द करा. अंबानीच्या जिओ सीम वर बहिष्कार घाला, अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी शेतकरी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी "शेतकरी जसं धरतीच्या पोटातून उगवणं जाणतो त्याच प्रमाणे तो कापणही जाणतो" असा सुचक इशाराही सरकारला दिला आहे.

हा मोर्चा प्रतिभा शिंदे व किशोर धमाले यांच्या नेतृत्वाखाली आला होता. यावेळी आंदोलनांची संघर्ष समिती, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, श्रमिक जनता संघ, स्वराज अभियान, म्युनिसिपल लेबर युनियन, बाल्मिकी विकास संघ, शोषित जन आंदोलन, लोकराज संघटन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आदी विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विश्वास उटगी, जगदीश खैरालिया, डॅा. संजय मंगला गोपाळ, सुब्रतो भट्टाचार्य, वंदना शिंदे, मुक्ता श्रीवास्तव, बिरपाल भाल, गिरीश भावे, गिरीश साळगावकार, नरेश भगवाने सहित ठाण्यातील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Full View


Tags:    

Similar News