पुण्यात चांदणी चौक भागात मुलगी टाकून निघून गेलेल्या महिलेची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी तिचा समुपदेशनाची जबाबदारी घेणार असल्याचे सांगितले. गुरुवारी 18 जून रोजी संबंधित महिला आपली चार महिन्याची मुलगी चांदणी चौक भागात ठेवून निघून गेली. त्या नंतर कोथरूड पोलिसांनी मुलीच्या वडिलांचा शोध घेऊन तिला त्यांच्या ताब्यात दिले. एवढ्यावरच न थांबता पुणे पोलीसांनी दुसऱ्या दिवशी वारजे पुलाखाली बसलेल्या या मुलीच्या आईला शोधले. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन करण्यात आले.
ही घटना मसजताच चित्रा वाघ यांनी महिलेच्या घरी जाऊन तिची व कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी महिलेची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी समुपदेशनाची सोय करणार असल्याचे त्यांनी सांगितले.