लहान मुलं अनेक गोष्टींसाठी हट्ट करतात ज्या त्यांच्या आरोग्यासाठी हानीकारक असतात. पालक त्यांच्या क्षमते नुसार संयम राखतात पण मुलांच्या कटकटी पुढं हरतात आणि हट्ट पुर्ण करतात. मुलांच्या कटकट करण्याच्या क्षमतेला पोस्टर पॉवर असे म्हणतात. पालकांनी नाही म्हणायला शिकणे हाच यावरील उपाय आहे.
कंपन्या लहान मुलांना आकर्षीत करण्यासाठी जाहिरात तंत्राचा अतिशय खुबीने वापर करतात. यावर उपाय म्हणजे पालकांनी सर्वात आधी ठामपणे नाही म्हणायला शिकलं पाहिजे. मुलं जेवढा हट्ट करतील तेवढ्याच ठामपणे नाही म्हणावं. लहान मुलांनी कमीत कमी 90 मिनीटे रोज मैदानी खेळ खेळलेच पाहिजेत. तेव्हा मात्र पालकांनी अभ्यास कर म्हणून ओरडू नये.
मुलांइतकेच मुलींनीही खुप खेळलं पाहिजे. 8 ते 13 वयोगटातील मुलींनी भरपुर खेळलं पाहिजे. मुली खेळ्यामुळे त्यांची बोन मिनरल डेन्सिटी वाढते. मुली जर या वयात खेळल्या नाहीत तर लठ्ठ पणा चिडचीड इत्यादी त्रास होऊ शकतात. त्यामुळे मुलांना आणि मुलींना खेळण्याची सोय उपलब्ध करुन देणे ही पालकांची जबाबदारी आहे.
याच विषयावर पाहा तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचं विश्लेषण...