‘माझी आई का उठत नाही’, सरकारकडे या प्रश्नाचं उत्तर आहे का?

Update: 2020-05-27 12:39 GMT

लॉकडाऊनच्या काळात उपासमार आणि कोरोनापासून वाचण्यासाठी शहरातील स्थलांतरीत मजूरवर्ग आपल्या गावांकडे धाव घेतोय. हजारो किलोमीटरची पायपीट करुन हे मजूर आपल्या गावी पोहोचत आहेत. या प्रवासातील त्य़ांच्या असह्य वेदना आजपर्यंत आपल्या समोर आहेत. पण आज सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ तुमच्या काळजाचंही पाणी पाणी करेल इतका दु:खदायक आहे.

हा व्हिडीओ आहे बिहारमधील मुजफ्फरपुर (Muzaffarpur) रेल्वे स्थानकावरील एका लहान मुलाचा जो आपल्या आईच्या अंगावरील चादरीसोबत खेळतो आहे. कदाचित तो तिला झोपेतून उठवण्याचाही प्रयत्न करत असेल. पण त्या कोवळ्या जीवाला हे माहिती नाही की त्याची आई कधीच उठणार नाही.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/267307381056280/?t=0

गुजरात मधून निघालेल्या श्रमिक रेल्वेतून ही आई आपल्या मुलासोबत निघाली होती. पण प्रवासातील उपासमार आणि गरमी तिला असह्य झाली आणि तिने आपला जीव सोडला.

या हृदयद्रावक घटनेनं सरकारला जाग येईल का? त्या मुलासाठी सरकार काय करेल माहिती नाही. कदाचित त्याचं संगोपण करेल किंवा घरच्यांना नुकसान भरपाई देईल. परंतू स्थलांतरीत मजूरांचे असंख्य प्रश्न त्याने सुटणार नाहीत.

Similar News