अमरावती मधील खासदार,अभिनेत्री नवनीत कौर राणा यांच्या दांडीया आणि गरबा नृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अमरावतीच्या रचना नारी मंचाने नवरात्रीच्या निमित्ताने दांडीया प्रशिक्षण आयोजित केलं होतं. या कार्यक्रमाला खासदार नवनीत कौर राणा देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी महिलांसोबत ठेका धरला. राणा यांच्या उपस्थितीमुळे तेथील महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला. त्यांच्या या रंगात आलेल्या दांडीया आणि गरबा नृत्याच्या व्हिडीओला चाहत्यांनी देखील पसंती दाखवली आहे.