संकर्षण कऱ्हाडेची अस्सल मराठवाडी भाषेतील कविता, ‘शंक्या.. काहीही व्हायलंय बे हे’
महाराष्ट्रात प्रत्येक भागात वेगवेगळी भाषा बोलली जाते. असं म्हणतात ना की दर १० कोसावर भाषा बदलत असते. याच बदलणाऱ्या भाषेतील गोडवा आणि मजा काही औरचं असते. मराठवाड्यातील भाषेचाही स्वत:चा असा भन्नाट लहेजा आहे. हाच लहेजा जपत अभिनेता आणि कवी संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) याने आपल्या कवितांमधून नेहमीच रसिकांना भुरळ घातली आहे.
यावेळीही त्याने पुन्हा एक सुंदर कविता लिहलीय. त्याने ती कविता अभिनेत्री स्पृहा जोशी ला (Spruha Joshi) जी स्वत:ही सुदर कविता लिहते व्हिडीओ कॉलींगमधून ऐकवलीय. त्या दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. नक्की पाहा.
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/1162820067409706/?t=9