Redmi 10 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. Redmi 10 वॉटरड्रॉप-शैलीतील डिस्प्ले नॉचसह येतो आणि त्यात ड्युअल रियर कॅमेरे देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. Redmi 10 Realme C35, Motorola Moto E40, Tecno Spark 8 Pro आणि Samsung Galaxy M21 2021 Edition सारख्या स्मार्टफोन्सशी सध्या मार्केट मध्ये स्पर्धा करेल.
redmi 10 किंमत काय असेल?
भारतात Redmi 10 ची किंमत 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटसाठी 10,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा फोन 6GB + 128GB मॉडेलमध्ये देखील येतो, ज्याची किंमत 12 हजार 999 रुपये आहे. Redmi 10 Flipkart, Mi.com, Mi Home आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरवर 24 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. हे कॅरिबियन ग्रीन, मिडनाईट ब्लॅक आणि पॅसिफिक ब्लू कलरमध्ये येते.
Redmi 10 सोबत कंपनीने लॉन्च ऑफर देखील दिली आहे. या अंतर्गत HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI वर 1 हजार रुपयांची झटपट सूट दिली जाईल. त्या तुलनेत, Redmi 9 भारतात 8 हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता.