AI च्या धोक्यांबद्दल उघडपणे बोलल्याबद्दल Geoffrey Hinton यांना सोडावी लागली नोकरी.. । Jeffrey Hinton resigns from Google
आज जगभरात खळबळ माजवणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे गॉडफादर मानले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन यांनी AI हे जगासाठी फार धोकादायक असल्याचे म्हंटले आहे. ते म्हणाले की, 'हे मानवतेसाठी धोक्याचे आहे. सध्या ते वरदान वाटेल, पण तसे नाही. Geoffrey Hinton असं का म्हणाले? त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम घडेल? त्यापाठीमागे त्यांचा काय हेतू आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा..
75 वर्षीय हिंटन यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या संपतील. चुकीची माहिती समाजात वेगाने पसरेल, जी थांबवणे शक्य होणार नाही. यासाठी हिंटन स्वत:ला जबाबदार धरतो आणि पश्चात्ताप करतो. ते म्हणाला, 'मी केले नसते तर दुसऱ्याने केले असते, पण एआय आले असते. आता त्याला सामोरे जाणे खूप कठीण होईल.
AI च्या धोक्यांबद्दल उघडपणे बोलल्याबद्दल Google ची नोकरी सोडावी लागली..
2012 मध्ये, डॉ. हिंटन, टोरंटो विद्यापीठातील त्यांच्या दोन विद्यार्थ्यांसह, इल्या सुत्स्केव्हर आणि अॅलेक्स क्रुशेव्स्की यांनी हजारो फोटोंचे विश्लेषण करू शकणारे नेटवर्क तयार केले. हे तंत्र AI चा आधार आहे. ते 1972 पासून AI वर काम करत आहेत, जेव्हा कोणीही AI बद्दल ऐकले देखील नव्हते. त्यांना आज AI हे जगासमोरील मोठे संकट वाटतं आहे. त्यामुळेच AI भविष्यात काय करेल? त्याचे धोके काय आहेत हे जगासमोर मांडण्यासाठी त्यांनी गलेलठ्ठ पगाराची Google मधील आपल्या नोकरीवर पाणी सोडले आहे.. त्यामुळे आता तुम्हाला या AI बद्दल काय वाटतं? AI खरंच भविष्यात धोकादायक ठरेल का? आम्हाला कॉमेंटबॉक्स मध्ये नक्की सांगा..