जगातील पहिली "मिस एआय" स्पर्धा: कसं व्हायचं सहभागी कीती आहे बक्षिस?

जगातील सर्वात सुंदर आणि आकर्षक एआय इन्फ्लुएन्सर मॉडेल निवडण्यासाठी पहिल्यांदाच स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड एआय क्रिएटर अवॉर्ड्सने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.;

Update: 2024-04-23 15:28 GMT

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, म्हणजेच एआय हा आता आपल्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा भाग होत आहे. सुमारे दोन ते तीन वर्षांमध्येच संपूर्ण जग एआय-मय झाल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर देखील कित्येक 'एआय इन्फ्लुएन्सर्स'चे अकाउंट्स पहायला मिळत आहेत. या सगळ्यातच आता चक्क 'मिस एआय' स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे.

जगातील सौंदर्यवतींची स्पर्धा ही 'मिस वर्ल्ड', 'मिस युनिवर्स' अशा नावांनी ओळखली जाते. मात्र आता जगातील सर्वात सुंदर आणि आकर्षक एआय इन्फ्लुएन्सर मॉडेल निवडण्यासाठी पहिल्यांदाच स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड एआय क्रिएटर अवॉर्ड्सने (WAIC) या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

या स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या एआय मॉडेलच्या क्रिएटरला 20 हजार डॉलर्स (सुमारे 16.7 लाख रुपये) किंमतीचं बक्षीस देण्यात येईल. यातील 5,000 डॉलर्स हे कॅश देण्यात येतील. तसंच मेंबरशिप प्रोग्राम, प्रमोशनल पॅकेज आणि पीआर सपोर्टच्या स्वरुपात इतर रक्कम देण्यात येईल.

या स्पर्धेमध्ये एआय मॉडेलची सुंदरता, संतुलन आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या गोष्टी तपासल्या जातील. सोबतच, या एआय मॉडेलची लोकप्रियता किती आहे, सोशल मीडियावर किती फॉलोवर्स आहेत हेदेखील पाहिलं जाईल.

काही प्रसिद्ध एआय इन्फ्लुएन्सर्समध्ये Aitana Lopez आणि Emily Pellegrini यांचं नाव घेता येईल. आयटानाचे सोशल मीडियावर 3 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत, तर एमिलीचे 2.81 लाख फॉलोवर्स आहेत.

या स्पर्धेमध्ये एआय मॉडेलला हँडल करणारा कोणताही क्रिएटर सहभागी होऊ शकतो. मात्र, त्यासाठी काही अटी देखील लागू करण्यात आल्या आहेत. एआय मॉडेलच्या क्रिएटरचं सोशल मीडिया अकाउंट असायला हवं आणि क्रिएटरचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असायला हवं या दोन मुख्य अटी आहेत. यातील एआय क्रिएटर्सना वेगवेगळ्या निकषांवर जज केलं जाईल.

Tags:    

Similar News