तुमचं WhatsApp चॅट कोणी वाचेल ही भीती असेल तरच ही बातमी वाचा...

Update: 2023-05-17 03:11 GMT

मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने चॅट लॉक फीचर लाँच केले आहे. यामध्ये युजर्स कोणतेही ग्रुप किंवा वैयक्तिक चॅट लॉक करू शकतात. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे या फीचरची माहिती दिली आहे. त्याने सांगितले आहे की, व्हॉट्सअॅपमधील नवीन लॉक फीचर तुमचे चॅट अधिक सुरक्षित करेल.'' आता हे सर्व ठीक आहे पण हे फिचर तुम्ही वापरणार असाल तर ते कसं सुरु करायचं? काही काळजी करू नका आम्ही तुम्हाला या सगळ्या संदर्भात माहिती देणार आहोत त्यासाठी माहिती संपूर्ण पहा.. आमच्या facebook व Youtube चॅनेलला तुम्ही अजूनही भेट दिली नसेल तर नक्की द्या. अनेक नवनवीन माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल..

व्हाट्सअप वापरत असताना आपलं खाजगी चॅट कुठे लीक होऊ नये याची धाकधूक अनेकांना असते. अगदी आपल्या महत्त्वाच्या ऑफिसच्या कामांपासून मग प्रेम युगलांच्या चॅट पर्यंत सर्वांनाच ते कोणी पाहिलं तर किंवा ते लीक झालं तर? याची भीती सर्वांनाच असते. आता याच भीतीचा विचार Whatsapp ने सुद्धा केलाय. यासाठीच आता Whatsapp ने नवीन फीचर लॉन्च केलेआहे. या फ्युचरच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला हवं ते चॅट, हवा तो ग्रुप लॉक करून ठेवू शकता. म्हणजे समजा उद्या तुमचा मोबाईल मित्राने किंवा आणखी कोणीही घेतला आणि जर त्याने तुमचं व्हाट्सअप ओपन केलं तर त्याला इतर सगळी माहिती दिसेल पण तुम्ही लॉक केलेली माहिती दिसणार नाही. अनेक वेळा आपली खाजगी माहिती अशा प्रकारे दुसऱ्यांच्या हाती लागते आणि मग त्याची स्क्रीन शॉट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग करून ती शेअर केली जाते. या सगळ्यालाच आता आळा बसणार आहेत..

आता हे फिचर एकटीव्हेट कसं करायचं? 


सर्वप्रथम, या वैशिष्ट्यासाठी व्हॉट्सअॅपला अपडेट करा.

यानंतर WhatsApp ओपन करा.

आता तुम्हाला लॉक आणि हाईड असा पर्याय दिसेल...

तो पर्याय निवडल्यानंतर मग तुम्हाला लॉक करायचं आहे त्या प्रोफाइलच्या DP वर टॅप करा.

आता तुम्हाला हाईड झालेल्या मेसेजच्या खाली नवीन चॅट लॉक फीचर मध्ये दिसेल, त्यावर क्लिक करा, त्यानंतर चॅट लॉक होईल.

त्याचप्रमाणे तुम्ही इतर चॅट देखील लॉक आणि हाईड करू शकता...

Tags:    

Similar News