iPhone 14 pro मधील फिचर या १० हजाराच्या फोन मध्ये...

Update: 2023-03-24 02:28 GMT

चायनीज टेक कंपनी Realme ने आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर आता त्यांनी अधिकृतपणे Realme C55 4G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. कंपनीच्या सी-सिरीजमधील हा आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन आहे.

या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे या फोनमध्ये जवळपास 1.50 लाख रुपये किंमत असलेल्या iPhone 14 Pro मध्ये दिलेले डायनॅमिक आयलंड फंक्शनॅलिटी फीचर देण्यात आले आहे. कंपनी त्याला 'मिनी कॅप्सूल' असं नाव दिले आहे.

तुम्ही किती पायऱ्या चालला हे स्मार्टफोन सांगेल..

डायनॅमिक आयलंड फीचरद्वारे डेटा किती वापरला गेला आहे आणि चार्जिंगची माहिती फोनच्या होम स्क्रीनवरच पाहता येईल. याशिवाय, वापरकर्ते त्यांच्या चालण्याच्या पायऱ्या देखील पाहू शकतील, परंतु हे वैशिष्ट्य अद्याप चाचणी टप्प्यात आहे. डायनॅमिक आयलंड कार्यक्षमता डिस्प्लेमधील पंच-होल कॅमेरा कटआउटच्या आसपास स्मार्टपणे केली जाईल.

किंमत किती आहे..?

कंपनीने हा स्मार्टफोन 3 व्हेरियंटमध्ये लॉन्च केला आहे. त्याच्या 4GB रॅम + 64GB स्टोरेजची किंमत 10 हजार 999 रुपये आहे, 6GB रॅम + 64GB स्टोरेजची किंमत 11 हजार 999 रुपये आणि 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. फोनची पहिला सेल 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता realme.com आणि Flipkart वर सुरू होईल.

फोन घेणार असाल तर खास ऑफर..

Realme C55 ची 27 मार्चपर्यंत realme.com आणि Flipkart वरून प्री-ऑर्डर केली जाऊ शकते. Realme.com वर रु. 1000 पर्यंत बँक ऑफर आणि Flipkart वर रु. 1000 चे एक्सचेंज डिस्काउंट प्री-ऑर्डरवर दिले जात आहे. Realme C55 दोन रंग पर्यायांमध्ये येतो, त्यात सनशॉवर आणि रेनी नाईट कलरचा समावेश आहे.

Tags:    

Similar News