Realme 9 सीरिज आणि पॅड मिनीचं जागतिक स्तरावर अनावरण झालं, जाणून घ्या फिचर्स
Realme कंपनी युरोपियन मार्केटमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे, जो Realme 9 सीरीजचा भाग आहे.
यासोबतच कंपनीने रिअॅलिटी पॅड मिनी सादर केला. ही दोन्ही उत्पादने १२ मे रोजी लाँच झाली आहेत.
Realme ९ या 4G स्मार्टफोनने स्नॅपड्रॅगन 680 4G चिपसेटसह बाजारात प्रवेश केला आहे. यात ५०००mAh ची बॅटरी देखील आहे, जी ३३W चार्जिंगसह आला आहे. या स्मार्टफोनमध्ये १०८-मेगापिक्सेल कॅमेरा आहे, जो प्रायमरी कॅमेरा आहे.
तसेच, यात ६.४ -इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर ९०Hz आहे.
Realme ९ ५G मीडियाटेक डायमेंशन ८१० चिपसेटसह येतो. यात ६.५ -इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. तसेच, त्याचा रिफ्रेश दर ९०Hz सह येतो. यात ५००० mAh बॅटरी आहे, जी १८ W चार्जिंगसह येईल.
Realme पॅड मिनीमध्ये ८.७ इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये Unisoc T616 चिपसेट दिला जाईल आणि तो १८W चार्जिंगसह ६४००mAh बॅटरी देण्यात आलीय.
Realme ९ सीरीजचे हे स्मार्टफोन्स भारतात आधीच लाँच झाले आहेत आणि आता युरोपियन मार्केटमध्ये लॉन्च करण्याची त्यांचीहि योग्य वेळ आहे.