OnePlus 10 Pro भारतीय बाजारात लॉन्च, पण किंमत किती आहे?
OnePlus 10 Pro हा फोन दोन प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. हा प्रीमियम सेगमेंट स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेतील Samsung Galaxy S22 सीरीज आणि iPhone 13 सीरीजशी थेट स्पर्धा करेल.
OnePlus ने आपला नवीनतम स्मार्टफोन OnePlus 10 Pro भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 1 चिपसेट देण्यात आला आहे. हे त्याच्या जुन्या मॉडेलपेक्षा चांगल्या दर्जाच्या AMOLED डिस्प्लेने सुसज्ज आहे. हा प्रीमियम सेगमेंट स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेतील Samsung Galaxy S22 सीरीज आणि iPhone 13 सीरीजशी थेट स्पर्धा करेल. कंपनीने स्मार्टफोनसोबत OnePlus Buds Pro देखील लॉन्च केला आहे.
Oneplus 10 pro ची किंमत काय?
हा फोन दोन प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. त्याच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 66 हजार 999 रुपये आणि 12GB + 256GB वेरिएंटची किंमत 71 हजार 999 रुपये आहे. फोनमध्ये Emerald Forest आणि Volcanic Black कलरचे दोन पर्याय मिळतील. जागतिक बाजारात फोनची सुरुवातीची किंमत 899 युरो (सुमारे 75 हजार 500 रुपये) आहे. भारतात त्याची विक्री 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे.
OnePlus 10 Pro मध्ये खासियत काय आहे?
फोन ड्युअल-नॅनो सिमला सपोर्ट करतो. हे Android 12 आधारित OxygenOS 12.1 वर चालते. यात 6.7-इंचाचा QHD+ (1,440x3,216 पिक्सेल) Fluid AMOLED डिस्प्ले आहे. हे दुसऱ्या पिढीच्या कमी-तापमान पॉलीक्रिस्टलाइन ऑक्साइड (LTPO) तंत्रज्ञानावर आधारित आहे. फोनच्या डिस्प्लेचा डायनॅमिक रिफ्रेश दर 1Hz आणि 120Hz दरम्यान आहे. स्क्रीनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन देण्यात आले आहे. फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 1 चिपसेट आणि 12GB पर्यंत LPDDR5 रॅमने सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात f/1.8 लेन्स आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 48-मेगापिक्सेल Sony IMX789 प्राथमिक सेन्सर आहे. 150-डिग्री फील्ड-ऑफ-व्ह्यूसह 50-मेगापिक्सेल Samsung ISOCELL JN1 अल्ट्रा-वाइड देखील समाविष्ट आहे. तिसरा लेन्स 8-मेगापिक्सेल टेलीफोटो आहे जो OIS सपोर्टसह जोडलेला आहे. सेल्फीसाठी, यात 32-मेगापिक्सलचा Sony IMX615 कॅमेरा सेन्सर आहे.
फोनमध्ये 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.2, GPS/A-GPS, NFC आणि USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. फोनमध्ये 5000mAh ड्युअल-सेल बॅटरी आहे जी 80W SuperVos वायर्ड चार्जिंग आणि 50W AirVos वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा 32 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज करण्याचा दावा करत आहे.