टेस्ला कंपनीच्या कारचा व्हिडिओ शेअर करणं कर्मचाऱ्याला पडलं महागात

Update: 2022-03-18 05:17 GMT

इलॉन मस्क यांच्या टेस्ला या कंपनीतील एका कर्मचाऱ्याला त्याच्या यूट्यूब चॅनलवर टेस्लाचा व्हिडिओ अपलोड करणं महागात पडलं आहे. जॉन बर्नल नावाच्या टेस्ला कामगाराने टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारच्या सेल्फ-ड्रायव्हिंग बीटा सॉफ्टवेअरचा एक व्हिडिओ youtube वर शेअर केला आहे. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याला आता कामावरून काढून टाकण्यात आले आहे. जॉन बर्नालने एआय अॅडिक्ट नावाच्या यूट्यूब चॅनलवर टेस्लाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो टेस्ला इलेक्ट्रिक कारने एका मोठ्या खांबाला आदळताना दिसत आहे. हा प्रकार त्याच्या कंपनीला कळताच त्याने त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.

टेस्ला धोरणाचा भंग केल्याचा आरोप

बर्नालच्या कामावरून कमी करण्यामागे कंपनीने त्याने टेस्ला धोरणाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. मात्र, लेखी स्वरूपात दिलेल्या नोटीसमध्ये त्यांना हटवण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. अपलोड केलेल्या व्हिडिओला 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. या सर्व प्रकारानंतर व्हिडिओ शेअर करणार बर्नाल म्हणाले की, व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर, ऑटोपायलट टीमच्या व्यवस्थापकाने मला हा व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितले. त्यांनी माझ्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सही घेतली.

टेस्लाची FSD बीटा प्रणाली काय आहे?

फुल सेल्फ ड्रायव्हिंग (FSD) सिस्टीम हे ड्रायव्हर असिस्टंट वैशिष्ट्य आहे. याद्वारे चालक स्टेअरिंगला हात न लावता कार चालवू शकतो. यासाठी ग्राहकांना दरमहा $12000 किंवा $199 इतका मोबदला भरावे लागतील.

Tags:    

Similar News