२०२० मध्ये होणाऱ्या टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोल्हापूरची कन्या तेजस्वीनी सावंत ही पात्र ठरली आहे. दोहा येथे सुरू असलेल्या नेमबाजी आशिआई अजिंक्यपद स्पर्धेत तिनं चौथे स्थान मिळवले आहे. तिच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राची मान देशात उंचावली आहे.
या स्पर्धेत पदक मिळवण्यात तिला यश आले नसले, तरी तिने महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये भारताला बारावा ऑलिंपिक कोटा मिळवून दिला आहे. कोल्हापूरच्या तेजस्विनीला प्रथमच ऑलिंपिकमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली आहे. या आधी २००८, २०१२ आणि २०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये तिची संधी हुकली होती. मात्र यावेळी तिने कसून मेहनत केली आणि ऑलिम्पीक स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.
शिवाय तेजस्विनीने ५० मीटर रायफल प्रोनमध्ये २०१० मध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. जागतिक स्पर्धेत विक्रमासह सुवर्ण जिंकणारी ती भारताची पहिली महिला नेमबाज ठरली होती. तसेच २००९ मध्ये तिने ब्राँझपदक मिळवून अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.