तुमच्यातल्या सावित्रीला आवाज देणारे नाटक "लोक- शास्त्र सावित्री"
सावात्रिबाई फुले यांची ३ जानेवारी रोजी जयंती आहे. यानिमित्त सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची तत्व जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी बदलापूर इथे एक खास नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकाची संकल्पना मांडली आहे आहे सायली पावसकर यांनी;
जनमानसात सावित्रीची ओळख आहे, तिचे नाव आहे परंतु तिचे तत्व रुजले नाही आणि हे तत्व रुजवण्याची प्रक्रिया मंजुल भारद्वाज लिखित - दिग्दर्शित नाटक "लोक- शास्त्र सावित्री" हे नाटक करते. सावित्रीने दिशा दाखवली परंतु आपण जागतिकीकरणाने रचलेल्या वाटेवर मार्गक्रमण करत आलो. सावित्रीच्या वाटेवर चालणे म्हणजे विचारांच्या वाटेवर चालणे जे आज अभावाने घडते. भारताची जनता आणि भारतीय महिला या दोघांचेही निर्णय कोणीतरी दुसरं घेतं आणि ते सहन करतात. शोषणाला बळी पडतात पण त्याच्याविरुद्ध आवाज उठवत नाहीत. भारतात आज कितीजण आहेत जे सावित्रीच्या पुढाकाराने शिकले, पण सावित्री घडवू शकले नाहीत. कारण प्रश्न आहे रचनात्मक पुढाकाराचा, न्यायसंगत वागण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा ! माझ्यासाठी पुढाकार कोण घेणार? या मानसिकतेवर "लोक- शास्त्र सावित्री" हे नाटक वैचारिक प्रहार करते.
सावित्री बाईंनी पितृसत्ता, सामंतवाद, जातीवाद यांच्या वर्चस्ववादाला आव्हान दिले होते. सावित्रीबाई फुलेंनी अज्ञानाच्या फेऱ्यातून अखंड समाजाला बाहेर काढले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनिष्ठ रुढींच्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी समाजाला प्रेरित केले. सावित्रीबाईंनी आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला होता...त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात अजूनही धगधगते का? असं म्हंटल जातं कि माणूस शिक्षणाने माणूस होतो पण खरंच तसं घडतं का? शिक्षण माणसाला न्यायसंगत करते का ? आणि जर तसं आहे तर मग बहिणाबाई कोण होत्या? बहिणाबाई तर अशिक्षित राहूनही माणूस म्हणून जगल्या. सावित्रीबाई आणि बहिणाबाई हे दोन ध्रुव आहेत. एक आहे विचार म्हणून अस्तित्व जागवण्याचं आणि दुसरे आहे जीवनदृष्टीने तत्व जगवण्याचे व या दोघांचा एकत्र येण्याचा बिंदू आहे माणुसकी !
नाटक "लोक- शास्त्र सावित्री"
जनमानसात सावित्रीची ओळख आहे, तिचे नाव आहे परंतु तिचे तत्व रुजले नाही आणि हे तत्व रुजवण्याची प्रक्रिया "लोक- शास्त्र सावित्री" हे नाटक करते. सावित्रीने दिशा दाखवली परंतु आपण जागतिकीकरणाने रचलेल्या वाटेवर मार्गक्रमण करत आलो. सावित्रीच्या वाटेवर चालणे म्हणजे विचारांच्या वाटेवर चालणे जे आज अभावाने घडते. भारताची जनता आणि भारतीय महिला या दोघांचेही निर्णय कोणीतरी दुसरं घेतं आणि ते सहन करतात. शोषणाला बळी पडतात पण त्याच्याविरुद्ध आवाज उठवत नाहीत. भारतात आज कितीजण आहेत जे सावित्रीच्या पुढाकाराने शिकले, पण सावित्री घडवू शकले नाहीत. कारण प्रश्न आहे रचनात्मक पुढाकाराचा, न्यायसंगत वागण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा ! माझ्यासाठी पुढाकार कोण घेणार? या मानसिकतेवर "लोक- शास्त्र सावित्री" हे नाटक वैचारिक प्रहार करते.
'थिएटर ऑफ रेलेवन्स'ने जीवनाला नाटकाशी जोडून मागील 28 वर्षांपासून जातीय मुद्दय़ावर 'दूर से किसी ने आवाज़ दी', बालमजुरीवर 'मेरा बचपन' अशी, कौटुंबिक हिंसेवर 'द्वंद्व', 'मैं औरत हूँ', लिंगनिदान या विषयावर नाटक 'लाडली', जैविक आणि भौगोलिक विविधतेवर 'बी-7' अशी नाटके रंगमंचावर आणली. मानवता आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या खासगीकरणाविरोधात 'ड्रॉप बाय ड्रॉप : वॉटर', मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठी 'गर्भ', शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱ्या विनाशावर 'किसानों का संघर्ष', कलाकारांना कठपुतली बनवणाऱ्या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटक "अनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स", शोषण आणि दमनकारी पितृसत्तेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकार देणारे 'न्याय के भंवर में भंवरी', समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठी 'राजगती' अशा नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी 'थिएटर ऑफ रेलेवन्स' लढत आहे! आजच्या या कठीण काळात 'थिएटर ऑफ रेलेवन्स'ने सांस्कृतिक सृजनकार घडवण्याचा निर्धार केला आहे! समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या मंडळींपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.