कष्ट आणि लोकांचा विरोध सहन करत त्यांनी स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवली-कविता ठाकरे
आधुनिक युगात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहेत. भारतीय स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभिक प्रवाहात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई फुले यांनी मोठी भूमिका बजावली.. अनेक कष्ट आणि लोकांचा विरोध सहन करत त्यांनी स्त्रियांना शिक्षणाची जणू काही शिदोरीच दिली. शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महान सावित्री आईला मी नमन करते.
- कविता उत्तम ठाकरे
https://youtu.be/ED7dqx0IeHM