‘नवविवाहितेची हत्या करणाऱ्या आरोपींना फासावर लटकवा’ तृप्ती देसाईंची मागणी
जालना जिल्ह्यातील मंठा येथे पाच दिवसांपूर्वी विवाह झालेल्या एका विवाहित तरुणीची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली. याबाबत बोलताना सामाजीक कार्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणाल्या की, “लॉकडाऊन मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. हिंगणघाट प्रकरण, हिंगोली येथील प्रियांका कांबळे हत्या प्रकरण आणि आता जालन्यातील हे प्रकरण अशा अनेक केसेस आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांनी सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचे आदेश देऊन या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करुन या नवविवाहितेची एकतर्फी प्रेमातून हत्या करणाऱ्या आरोपींना फासावर लटकवा.” अशी मागणी देसाई यांनी केली आहे.