फेअर अँड लव्हली कंपनीने त्या नावातील फेअर हा शब्द काढून टाकला याचे कौतुक होते आहे. गोरेपणाचे महत्व समाज मनातून नष्ट करण्यासाठी व काळा गोरा भेद मिटवण्यासाठी हे केले आहे त्याचे कौतुक करताना शिक्षण तज्ञ लीलाताई पाटील यांनी तीस वर्षांपूर्वी हेच काम केले. त्यांचे द्रष्टेपण लक्षात घ्यायला हवे. 'गोरी गोरी पान फुलासारखी छान ' अशी कविता पूर्वी अभ्यासक्रमात होती. लीलाताई म्हकणाल्याे' जर गोरी व्यक्ती छान असते असे जर मुलांवर ठसले तर शेतात कष्ट करणारी उन्हाने काळवंडलेली त्यांची आई मुलांना छान वाटणार नाही' तेव्हा ही वर्णभेद निर्माण करणारी कविता शिकवायला नको पण त्या विरोध करून थांबल्या नाहीत तर त्यांनी 'हसणारी खेळणारी गाणारी छान ,दादा मला एक वहिनी आण 'अशी पर्यायी कविता तयार करून ती शिकवली. केवळ विरोध न करता त्याला सकारात्मक पर्याय निर्माण केला व गोरेपणाच्या या दंतकथेचा त्यांनी सक्रिय विरोध तीस वर्षांपूर्वी करून दाखवला फेअर अँड लव्हली च्या फेअर शब्द काढण्याचे कौतुक करताना लीलाताईंच्या या द्रष्टेपणाची आठवण ठेवायला हवी.
हेरंब कुलकर्णी