पुजा मक्कर कोरोनाची लस घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला पत्रकार!

Update: 2021-01-05 08:51 GMT
पुजा मक्कर कोरोनाची लस घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला पत्रकार!
  • whatsapp icon

गेल्या वर्षभरापासून जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना माहामारीवर लस शोधण्यात शास्त्रज्ञांना अखेर यश आलं आहे. ब्रिटन पाठोपाठ अमेरिका आणि भारतातही शास्त्रनांनी कोरोनावर लस शोधली आहे. विविध वैद्यकीय चाचण्यांनंतर भारत बायोटेक या लस संशोधन कंपननीने बनवलेल्या 'कोवैक्सीन' या लसीच्या वापराला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे.

केंद्राने परवानगी दिल्यानंतर महिला पत्रकार पुजा मक्कर या महिला पत्रकाराला काल ही लस देण्यात आली आहे. एका इंग्रजी वाहीनीशी बोलताना पुजा मक्कर यांनी लसीच्या विरोधात सुरू असलेल्या सर्व नकारात्मक चर्चा फेटाळून लावल्या आहेत. "लसी विरोधात जो काही अपप्रचार सुरू आहे, तो चुकीचा आहे. लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. मला २० तासांआधी ही लस देण्यात आली आहे. आणि मी ठणठणीत आहे." असं पुजा म्हणाल्या.

सोमवारी केंद्र सरकारने कोवेक्सीनला सामान्य वापरासाठी परवानगी दिल्यानंतर पुजा यांना दिल्लीती एम्स रुग्णालयात काल दुपारी २ च्या सुमारास ही लस देण्यात आली. लस दिल्यानंतर पुजा यांना काही वेळासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. ६ तास नरीक्षणाखाली ठेवल्यानंतर पुजा यांना एम्सच्या डॉक्टरांकडून एक फॉर्म देण्यात आला, ज्यात त्यांना लस घेतल्यानंतरच्या अनुभवावर प्रश्न विचारण्यात आले.

वेक्सीन घेतल्यानंतर भविष्यात कोणताही त्रास जाणवल्यास पुजा यांनी स्वरीत एम्सच्या डॉक्टरांशी संपर्क करावा यासाठी त्यांना एक विशेष दुरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे. पत्रकार आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ या नात्याने पुजा यांनी ही लस घेऊन कोरोना लसीवरून समाजात सुरू असलेल्या विविध चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या धाडसाचं मॅक्स वूमनच्या टिमकडून अभिनंदन.

Tags:    

Similar News