ऐ मनके "रोगी" म्हणत युवासेनेच्या तरुणीने अमृता फडणवीस यांचा घेतला समाचार..

"ऐ मनके "रोगी" तु भी ईलाज करले हमारे "कर्मयोगी" से !!" युवासेनेच्या तरुणीचे अमृता फडणवीस यांना जशास तसे उत्तर..

Update: 2022-04-29 06:16 GMT

"राज्याच्या राजकारणामध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं निश्चित करण्यात आल्याच्या बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारवर कौतुकाचा वर्षाव केलाय. राज ठाकरे पाठोपाठ आता अमृता फडणवीस यांनी देखील ऐ 'भोगी', कुछ तो सीख हमारे 'योगी' से! असं म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला भोगी असं म्हणत योगी सरकार कडून काहीतरी शिकण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या ट्विट नंतर समाजमाध्यमांवर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यामध्ये युवासेनेच्या शीतल शेटे या महिला कार्यकर्त्यांने अमृता फडणीस यांना जशास तसे उत्तर दिले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटचा फोटो शेअर करा त्यांना 'रोगी' असे म्हटले आहे. शीतल यांनी या संदर्भातील एक ट्विट केलं आहे त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हंटल आहे की, "ऐ मनके "रोगी" तु भी ईलाज करले हमारे "कर्मयोगी" से !!"

राज्याच्या राजकारणामध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं निश्चित करण्यात आलंय. या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे राज ठाकरे यांनी केलं होतं त्यानंतर अमृता फडणवीस यांनी सुद्धा यासंदर्भात एक ट्विट केले होते.

Tags:    

Similar News