"राज्यपालांची मंदिरं उघडण्याची मागणी हे षडयंत्र तर नाही ना?" मंत्री यशोमती ठाकूर यांचा सवाल

Update: 2020-10-14 05:38 GMT

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल पत्र ही दुर्दैवी आणि असंवैधानिक घटना असल्याची टीका महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. धोका टळलाय तर मग लालकृष्ण अडवाणींना भूमीपुजनाला का बोलवलं नाही? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला आहे. राज्यपालांनी जर यामुळे कोरोना पसरणार नाही याची जबाबदारी घेतली तर मंदिरे खुली करायला हरकत नाही. असे सांगत राज्यात कोरोनाची संख्या कमी होत असताना हे षडयंत्र तर नाही ना असा प्रश्न ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे नक्की वाद?

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवीन नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. भाजप, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी मंदीर उघडण्यावरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष करत असताना आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी या वादात उडी घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र लिहून मंदीरं उघडण्याची माणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ..

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. असं म्हणत राज्यपालांना खास ठाकरे शैलीत उत्तर दिलं आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

त्याचा मंत्री यशोमती ठाकूर यांनी खास समाचार घेतला आहे.


Full View
Tags:    

Similar News