Video: अल्पवयीन मुलीला स्मशान भूमीत पूजण्याचा अघोरी प्रकार...

Update: 2021-09-27 09:02 GMT

वाई तालुक्यातील सुरूर गावच्या स्मशानभूमीत रविवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पुणे हडपसर येथून आलेल्या काही लोकांनी आणि समवेत असलेला मांत्रीक याने एका मुलीची पुजा केलेला विडीओ व्हायरल झाला आहे.त्यामुळे हा अघोरी प्रकाराचा भाग असल्याची चर्चा आहे.

सुरुर येथील स्मशानभूमीत चाललेला अघोरी प्रकार हा रस्त्याने जाणाऱ्या काही मुलांनी पाहीला व त्यांनी उपस्थित लोकांना विचारपूस केली . मात्र उडवाउडवीची उत्तरे देवून अघोरी प्रकार करणाऱ्या लोकांनी पळ काढला. मात्र यावेळी त्याच्यासमवेत असलेला कोंबडा, लिंबे आणि इतर पूजेचे साहित्य दिसत असून नक्की बळी कोणाचा देण्यात येणार होता असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, सुरूर येथे येण्यापूर्वी पीडित मुलीला वाई येथील कृष्णा नदीत अंघोळ घालण्यात अली.नंतर सुरूर येथे घेवून आलो आहे अस या विडीओ मध्ये महिला बोलत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे याचा पोलोसांनी शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.


Full View

Tags:    

Similar News