गर्भवतींच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात अळ्या, अदिती तटकरेंनी दिले चौकशीचे आदेश
पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या आणि सोनकीडे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे गरोदर महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रकरण समोर येताच प्रशासनाने त्वरित चौकशीचे आदेश दिले आहेत. महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
पुण्यातील शिरूर तालुक्यातील आंबळे गावातील आरोग्य विभागातून गरोदर महिलांना पोषण आहार पुरवला जातो. या आहारामध्ये बदाम, खारीक, काजू, गूळ आणि इतर पदार्थांचा समावेश असतो. काही महिलांना या आहारामध्ये अळ्या आणि सोनकीडे आढळून आले असून या घटनेमुळे गरोदर महिलांमध्ये संताप आणि निराशा व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे गरोदर महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे असल्याने अदिती तटकरे यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.