एका टॅटूमुळे उघडं पडलं स्मृतीचं गुपित...जाणून घ्या कोणासोबत जातेय डेटला!

भारताची धडाकेबाज महिला क्रिकेटपटू स्मृती मांधना अनेक तरूणांची क्रश आहे. पण स्मृती एका गायकाला डेट करतेय. जाणून घ्यायची इच्छा आहे मग वाचा ही बातमी...;

Update: 2022-03-15 10:04 GMT

 महिला विश्वचषकातील (Women World Cup 2022) आपल्या दुसऱ्याच सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिज संघाचा (India vs West Indies) १५५ धावांनी पराभव केला. या सामन्यात स्मृती मांधनाने (Smriti Mandhana) १२३ धावांची धमाकेदार शतकी खेळी केली. ११८ चेंडूंमध्ये स्मृतीने १३ फोर आणि २ सिक्स मारले, यात तिचा स्ट्राईक रेट १०४.२४ चा होता. तिच्या या खेळीनंतर ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेण्ड व्हायला लागलीये.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार स्मृती मांधना लोकप्रिय गायक पलक मुच्छलचा भाऊ पलाश मुच्छलला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पलाश मुच्छलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेयर केला, ज्यात त्याच्या हातावर SM18 असं गोंदवलेला टॅटू दिसतोय. आता आपण म्हणाल त्यात काय एवढं? साधा टॅटूच तर आहे. पण थांबा, स्मृती मांधना १८ नंबरची जर्सी घालते. अनेक वेळा स्मृतीला पलाश मुच्छलसोबत याआधी पाहिलं देखील गेलं आहे.

हा अभिनेता आहे स्मृतीचा क्रश

एका युट्यूब चॅनलशी बोलताना स्मृती मांधनाने कार्तिक आर्यन आपला क्रश असल्याचं सांगितलं होतं. सोनू के टीटू की स्वीटी हा चित्रपट आपल्याला खूप आवडल्याचं स्मृती म्हणाली होती. स्मृतीने दोन वेळा हा चित्रपट बघितला. तेव्हापासून कार्तिक आर्यन आपला क्रश असल्याचं ती म्हणाली.

Tags:    

Similar News