नवऱ्याचे छत्र गमावलेल्या बहिणीसाठी धावून आले नात्यापलीकडचे भाऊ

न्यूज पेपर विक्रीचे व वाटपाचे काम करणार्या नवऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे नवऱ्याचे छत्र गमावलेल्या तनिष्का या महिले सोबत adv. असीम सरोदे यांनी रक्षाबंधन साजरा केला.;

Update: 2021-08-23 05:54 GMT

मागील दोन वर्षा संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले. या परिस्थितीत अनेक स्त्रियांनी आपले पती गमावले. त्या विधवा झाल्या. कोरोनामुळे अशा स्त्रियांना अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील गरीब स्त्रियांना सरकारने आर्थिक मदत करावी, त्यांच्या कुटुंबाना उभे राहण्यासाठी आवश्यक पाठबळ द्यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन राज्यात अनेक ठिकाणी कोरोणामुळे विधवा झालेल्या महिलांकडून राखी बांधून घेत रक्षाबंधण साजरे केले.

याच प्रमाणे अनेक ठिकाणी लोकांनी अश्या प्रकारे विधवा महिलांकडून राखी बांधून घेतली. पुण्यातील कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी तनिष्का या महिले सोबत रक्षाबंधन साजरा केला. तनिष्का चा नवरा दीपक हा न्यूज पेपर विक्रीचे व वाटपाचे काम करायचा. करोना मुळे त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले. नवऱ्याचे छत्र गमावलेल्या या महिलेच्या घरी जाऊन त्यांनी रक्षाबंधन साजरे केले. यावेळी त्यांच्यासोबत रिशान सरोदे व अनुप कांबळे देखील उपस्थित होते.

या महिलांना सरकारने आर्थिक मदत घ्यावी व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील १२४ तालुक्यात नेटवर्क स्थापन केले असून त्यामार्फत या महिलांना मदत करणे सुरू असून सरकारकडे पाठपुरावा सुरू त्यानी सांगीतले. मंत्री यशोमती ठाकूर, धनंजय मुंडे व मुख्यमंत्री यांनी याविषयी लक्ष घालावे अशी विनंती देखील त्यांनी केली.

Tags:    

Similar News