चंद्रकांत पाटील हिमालयात कधी जाणार? समाजमाध्यमांवर मीम्सचा धुमाकूळ..

Update: 2022-04-16 18:25 GMT

कोल्हापूरातील विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय आणि भाजपचा पराभव यामुळे चंद्रकांत पाटील यांना जेवढा त्रास झाला नसेल त्यापेक्षा जास्त त्रास त्यांच्या एका वक्तव्याने त्यांना आता होतो आहे. दादांचा कोल्हापूर ते पुणे अशा राजकीय प्रवासात हिमालय आल्याने आता दादांना टीकेला सामोरे जावे लागते आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत बोलताना कोल्हापुरातील "कुठल्याही आमदाराने राजीनामा द्यावा, त्याठिकाणी पोटनिवडणूक घ्यावी त्या ठिकाणी मी निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईन" असं वक्तव्य केलं होतं. आता त्यांनी 2019 मध्ये केलेल्या या वक्तव्याची चर्चा आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी पोटनिवडणुका पार पडल्या व त्याचा निकाल आज जाहीर झाला. या निकालात भाजपला मोठा पराभवाचा सामना करावा लागला आहे. चंद्रकांत पाटील या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे नव्हते पण भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपच्या पराभवाची जितकी चर्चा नाही इतकी चर्चा चंद्रकांत दादा पाटील यांच्या एका या विधानाची आहे. चंद्रकांत दादा आणि हिमालय हे दोन शब्द सध्या कोणत्याही सोशलमीडिया साइट्सवर तुम्हाला पहायला मिळतील.

नक्की काय मीम्स व्हायरल होतं आहेत व काय चर्चा चालू आहे पाहुयात..

समाज माध्यमांवर सध्या चंद्रकांतदादा पाटील यांचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. जयंत अंकुश महाडिक यांनी चंद्रकांत पाटील यांना ट्विटरवर टॅग करत म्हंटलं आहे की, #ChandrakantPatil यांनी आता कोल्हापुरच्या जनतेला बोललेले हिमालयाचे वाक्य खर करून दाखवावे. रोख-ठोक..असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे एक मिम्स शेअर केले आहे. या शेअर केलेला फोटोमध्ये वरच्या बाजूला एका वृत्तवाहिनीच्या बातमीचा फोटो आहे. त्या बातमीत कोल्हापूरची निवडणूक हरलो तर हिमालयात जाईल असं चंद्रकांत पाटील म्हणतं आहेत. अगदी त्यात फोटोच्या खाली दुसरा एक फोटो जोडत चंद्रकांत दादा पाटील हे पाठीला बॅग अडकवून हातात काठी घेऊन हिमालय चढत आहेत असं दाखवण्यात आला आहे.

तर अभिजीत शिंदे यांनी कोल्हापूरचा निकाल बघून चंपा दादा पोहोचले हिमालयात ❤️ शब्दालाजागणारानेता ❤️ असं म्हणत हा फोटो शेअर केला आहे. त्या फोटो मध्ये चंद्रकांत पाटील हे हिमालयात ध्यानाला बसले आहे. या फोटोवर, मी पोहोचलो रे हिमालयात..असं कॅपशन सुद्धा लिहिलं आहे.

तर क्लाईड क्रास्टो यांनी चंद्रकांत पाटील कधी जाणार? असं म्हणत त्यांचे एक मीम्स शेअर केला आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये चंद्रकांत पाटील हे हिमालयात बसले आहेत आणि त्यांनी भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. एका साधूच्या वेषातील त्यांचा हा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की, हिमालय की गोद मे..

अशा प्रकारचे अनेक मीम्स आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. खरंतर चंद्रकांत पाटील यांनी केलेलं हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. अशाच प्रकारचे आणखीन काही मीम्स समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत ते काय आहेत ते देखील पाहूयात..




 


चंद्रकांत दादा पाटील यांचा हा एक फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यामध्ये ते भगव्या रंगाचे वस्त्र घालून बसले आहेत. हातामध्ये माळ घेऊन ते नामजप करत आहेत. दाढी व केस पांढरे झालेले आहेत अगदी एखाद्या साधुचा जसा वेष असतो तशा वेशात ते या फोटो मध्ये दिसतं आहेत. त्याच्या त्या वेशातील फोटो आहे व त्याच फोटोच्या शेजारी त्यांचा आणखीन एक फोटो आहे ज्यामध्ये ते हसत आहेत.

तर शिवसेनेने देखील असंच एक पोस्टर लावल्याचे पाहायला मिळात आहे. यामध्ये चंद्रकांत दादा हिमालयात कधी जाताय? असं लिहिलं आहे. या फोटोच्या पाठीमागे हिमालयाचे चित्र दाखवले आहे. त्याच सोबत एक कलश, काठी आणि जप करण्याची एक माळ असं दाखवण्यात आला आहे.




 


Tags:    

Similar News