बारामतीत मतदारराजा कोणाच्या पारड्यात....

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती लोकसभा उमेदवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तसेच आई श्रीमती आशाताई पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार);

Update: 2024-05-07 09:32 GMT

सर्वत्र निवडणुकांचे तिसरे चरण आज सुरू आहे.सगळीकडेच मतदानाबाबत जागरूकता वाढलेली असताना बारामतीतिल निवडणूक ही अत्यंत चुरशी निवडणूक ठरत आहे. याचे कारण बारामती लोकसभेत पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होतांना दिसत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वतः त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात उतरलेल्या असून त्यांच्या विरोधात नणंद सुप्रिया सुळे या उभ्या आहेत. आता नेमकं मतदारराजा कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया x हॅंडलवरून पोस्ट केली आहे. त्यामध्ये आजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवार यांच्या आई आणि सुनेत्रा पवार यांच्या सासूबाई आशाताई पवार या उपस्थित दिसत असून, या तिघांनी काटेवाडी मतदार केंद्रावर जावून मतदान केल्याची चित्रफीत सुनेत्रा पवार यांच्या सोशल मिडिया हँडलवरून वायरल झाली आहेत.

सुनेत्रा पवार म्हणाल्या "आज सकाळी ७ वाजता माझ्या काटेवाडी गावातील मतदान केंद्रावर माझ्या सासूबाई म्हणजेच आई श्रीमती आशाताई पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला" अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.

याच पोस्टमध्ये त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, "आपण सर्वांनी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, या देशाच्या प्रगतीसाठी आवर्जून मतदानाचा हक्क बजवावा." "आज पर्यन्त लाभलेली तुमच्या सर्वांची सोबत , प्रेम,आशीर्वाद या पुढच्याही प्रवासात कायम राहू द्या" अशी अपेक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

या अपेक्षेसह सर्व नागरिकांना सुनेत्रा पवार यांनी प्रोत्साहन दिले. मतदान हा आपला अधिकार आहे हा विचार त्यांनी स्वतःच्या वर्तनातून समाजापुढे ठेवला आणि स्वत: देखील आपला हक्क चोख बजावला. लोकशाहीचा श्रेष्ठ अधिकार मतदान हा आहे असे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, बारामती कोणाची होणार ? मतदारराजा कोणाच्या पारड्यात आपली मत टाकणार ? सुनेत्रा पवारांची विजयी होणार की सुप्रिया सुळे हे पाहणे गरजेचे.

Tags:    

Similar News