अनेक दिवस गुप्त रेडिओ स्टेशन चालवणार्या उषा मेहता कोण होत्या?
रेडिओच्या माध्यमातुन त्या कोणते महत्वाचे काम करत होत्या वाचा सविस्तर..;
खरतर भारतीय स्वातंत्र्यचळवळ ही सर्वात मोठी लोकचळवळ होती. यामध्ये लाखो स्त्रिया व पुरुष आपली जातपात उच्चनीचता हे सगळं विसरून ब्रिटिश सरकार विरोधात लढण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अनेक महिला स्वातंत्र्य चळवळीत काम करत होत्या. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने अगदी सर्व स्तरातील स्त्रिया चळवळीमध्ये सहभागी होऊ लागल्या होत्या .गुप्त रेडिओ स्टेशन चालवून जनतेला महत्वाचे संदेश देण्याचे काम त्या करत होत्या.त्या स्वातंत्र्य लढयात रस्त्यावर जरी उतरल्या नसल्या तरी त्यांचे योगदान हे अत्यंत महत्वाचे होते. त्यांच्या याच प्रवासविषयी आपण आता या विडिओ मध्ये पाहणार आहोत.
उषा मेहता यांचा जन्म 25 मार्च 1920 ला सुरत येथे झाला. त्यांच्यावर लहानपणापासूनच महात्मा गांधीजींचा प्रभाव होता. त्या गांधीजींच्या शिबिरात राहत होत्या या ठिकाणी त्यांनी अनेक गोष्टी आत्मसात केल्या. त्यांचे वडील इंग्रजांच्या दप्तरी कोर्टात जज असल्यामुळे त्यांना उघड उघड त्या लढ्यात भाग घेता येत नव्हता. मात्र दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांनी आपले भारतीय सैनिक लढण्यास भाग पाडले त्यामुळे सर्वत्र इंग्रज सरकारविरोधात फार मोठी नाराजी होते. आपला काहीही संबंध नसताना आपल्याला लढावे लागणार हे समजल्यानंतर काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्य ही चळवळ हातात घेतली. त्यावेळी उषा यांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडून पंधरा दिवस त्या भूमिगत झाल्या. आता स्वस्थ बसून चालणार नाही म्हणून त्यांनी कोणालाही न समजता आपल्या साथीदारांसह एक रेडिओ स्टेशन चालू केले.
त्याचबरोबर आपल्या इतर साथीदारांना ही अशा प्रकारची रेडिओ स्टेशन सुरू करण्यास त्यांनी मदत केली. या रेडिओ स्टेशन वरून महात्मा गांधीजींची सर्व संदेश, स्वातंत्र्य चळवळीतील मोठ्या नेत्यांची भाषणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या करू लागल्या. देशभक्तीपर गाण्यांनी मधून लोकांना इंग्रजांविरुद्ध चीड निर्माण करण्याचे मोलाचे काम त्यांनी या माध्यमातून सुरु केले. क्रांतीकारकांचे बॉम्ब स्पोर्ट, जमशेदपुर हरताळ, चिमूर व आष्टी येथील स्त्रियांवरील अत्याचार या विषयी सर्वात प्रथम बातम्या या रेडिओ वरून प्रसारित केल्या होत्या. त्यांच्या या कामाला व्यापारी, सूत गिरणी मालक आणि इतर अनेक श्रीमंत लोकांकडून मदत म्हणून देणगी दिल्या जात होत्या.