२१ व्या वर्षीच आपल्या प्राणाची आहुती देणार्या प्रीतीलता वड्डेदार कोण होत्या?

इंग्रजांना जिवंत सापडू नये म्हणून सायनाईड खाऊन दिल होत बलिदान..;

Update: 2021-08-15 10:09 GMT

प्रीतीलता वड्डेदार या मुलीने वयाच्या २१ व्या वर्षीच इंग्रजांविरुद्ध लढतांना आपल्या प्राणाची आहुती दिली होती. याविषयी फारच कमी लोकांना माहीती आहे. या मुलगीचे नाव होते प्रीतीलता वड्डेदार. प्रीतीलता वड्डेदार यांचा जन्म बंगाल मधील चिटगाव येथे १९११ साली झाला होता. अगदी शाळेत असल्यापासूनच त्या हुशार होत्या. त्यांनी फिलॉसॉफी विषयामध्ये पदवी सुद्धा प्राप्त केली. १९३२ च्या दरम्यान त्याची भेट सुर्यसेन यांच्या सोबत झाली. सुर्यसेन हे त्यावेळेस क्रांतिकरकांचे प्रेरणास्थान बनले होते, ब्रिटिशांकडून शस्त्र लुटण्याचे त्यांचे किस्से लोकांच्या नेहमी ओठावर असत.

सुर्यसेन यांना भेटल्यानंतर त्यानीं आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेण्याचं ठरवले. पण देशभक्तीने प्रेरित झालेल्या प्रतीलता यांनी माघार घेतली नाही. त्या क्रांतिकारी गटातील सदस्य झाल्या. युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची जबाबदारी सुद्धा त्याच्यावरच सोपवली होती. या हल्ल्यासाठी २३ सप्टेंबर १९३२ हा दिवस ठरवण्यात आला. हल्ल्यासाठी निवडलेल्या क्रांतीकारकांना पोटॅशिअम सायनाईड देऊन ठववले होते. कारण हा हल्ला करताना कोणी जिवंत सापडू नये. प्रीतीलताने हल्ल्यासाठी एका पंजाबी माणसासारखी वेशभूषा केली होती. २३ सप्टेंबर ला सकाळी ११ वाजता त्यांनी त्या क्लब वर हल्ला केला.

हल्ल्याच्यावेळेस क्लब मध्ये ४० इंग्रज अधिकारी आणि काही इंग्रज पोलीस उपस्थित होते. आग लागल्याने पोलिसांनी गोळीबार सुरू केला आणि एक गोळी प्रीतीलता यांना येऊन लागली, इंग्रजांनी त्यांना घेरले. पण प्रीतीलता यांनी एका क्षणाचाही विचार न करता सायनाईड ची गोळी घेतली आणि इंग्रजांना फक्त त्यांचा मृतदेह मिळाला.

Tags:    

Similar News