देशातील बलात्काराच्या घटनांमुळे ट्विटरवर लोकांचा उद्रेक; #Whendoesitstop ट्रेंडीग...

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी दिलेल्या एका निर्णयाविरोधात देशात संतापाची लाट उसळी आहे. लोकांनी भारतीय न्याय व्यवस्थेवर प्रश चिन्ह उभे केले आहेत.

Update: 2021-01-20 16:01 GMT

गेल्या काही काळात देशात हृदय पिळवटून टाकणाऱ्या बलात्काराच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. यूपी, दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि विशेष म्हणजे भारतातील सर्वात साक्षर असलेलं राज्य केरळ तिथेही बलात्काराच्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या घटना समोर येत आहेत.

फेब्रुवारी २०२० मध्ये हैद्राबादमध्ये प्रियांका रेड्डी नावाच्या मुलीची बलात्कारानंतर जाळून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर यूपीच्या बलरामपूर, हाथरस आणि आता सर्वात क्रूरता म्हणजे केरळच्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ४४ नराधमांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

देशात वारंवार महिलांविरोधात घडणाऱ्या या घटनांमुळे समाजात रोषाचं वातावरण पसरलं आहे. त्यात टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका बातमी नुसार सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाचा निकाल देताना चीफ जस्टीस दीपक मिश्रा यांनी लग्नानंतर जर पतीने पत्नीवर बलात्कार केला तर त्याला गुन्हा म्हणता येणार नाही असा निकाल दिला आहे.

या निकालाच्या बातमीचे स्क्रिन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला आहे. महिलांच्या बाबतीत घडणारे हे गंभीर गुन्हे कधी थांबतील हे विचारत लोकांनी #whendoseitstop ही मोहीम उत्फुर्तपणे सुरू केली आहे.

सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी गंभीर पाऊलं उचलावी आणि महिलांच्या विरोधात घडणाऱ्या गुन्हे थांबवावे अशी मागणी केली आहे. तसेच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन शिकवावा असाही संदेश या ट्विट्स मध्ये देण्यात आलाय.

Tags:    

Similar News