तमाम गृहिणींचा एकच प्रश्न आज भाजी काय ? आज जेवायला काय करू ? हा यक्षप्रश्न कायमचा सोडवूया !
रोज काय नवनवीन जेवण करायचं? हा अनेकांपुढे असलेला प्रश्न आहे. पण तुम्हला जर आठवडाभर काय बनवायचं याचा अभ्यासपूर्ण चार्टच मिळाला तर...? आहे, असा चार्ट आहे आणि हे वाचल्यावर तुम्ही देखील म्हणाला थँक्स डीडी, खूप हायसं वाटत आहे. नक्की उद्यापासून इम्प्लिमेंट करेल. धनंजय देशपांडे यांचा सर्वांना उपयुक्त असलेला हा लेख जरूर वाचा..;
अनेक मैत्रिणीचा एकच प्रश्न सतत माझ्यासमोर येत असतो. कालच एकीने वैतागून विचारलं की, "डोकं काम करत नाही. काय करावं रोज रोज वेगळं? सुचत नाही. नेहमी हॉटेलचे पार्सल मागवणे परवडत पण नाही आणि तब्येतीलाहि चांगलं नसत. काय करू?"
तिला जे मी सांगितलं ते पाहून ती तर खुश झालीच अन म्हणाली की,
"थँक्स डीडी, खूप हायसं वाटत आहे. नक्की उद्यापासून इम्प्लिमेंट करेल"
तर तिला जे समाधान मिळालं तेच सर्व गृहिणींना मिळावं म्हणून हि पोस्ट जाहीर करतोय.
मी जे आता देतोय ते अतिशय काळजीपूर्वक आणि कळकळीने काहीतरी देतोय
त्यात काही फेरबदल थोडेफार तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता.
पण एक गाईडलाईन म्हणून हे पाहावे आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करावे
एक महिन्यांनी तुम्ही स्वतःच मला सांगाल की,
"डीडी, खूप हलकं झालं आता !!"
*
तर आठवडाभर काय काय बनवायचे याचा अभ्यासपूर्वक तयार केलेला चार्टच देतोय.
तो पाहिल्यावर लक्षात येईल की, ज्या दिवशी कोरडी भाजी आहे तेव्हाच फक्त वरण आहे, अन रस्सा भाजी असेल तेव्हा वरणाला सुट्टी !
गृहिणीचे कष्ट कमी होतील शिवाय मुलांना व्हरायटी मिळेल
इव्हन, मुलांना आवडणारे थोडेसे जंक फूड पण शेड्युल मध्ये एक दिवस आहेत, त्यामुळे तेही खुश राहतील पण सतत तेच मागणार नाहीत
या चार्टमुळे "रोज काय करू ? " हा प्रश्न तर मिटेलच
शिवाय
रोज / एक दिवस आड भाजी आणायला जाणे वाचेल (म्हणजेच वेळ व पेट्रोल वाचेल)
यात आठवडाभर फ्रिजमध्ये टिकणाऱ्या भाज्या दिल्यात, त्यामुळे एक आठवडा मांडायला जाणे वाचले.
बटाटे / कांदे / कडधान्ये आणि बेसन पीठ मात्र एक्स्ट्रा ठेवायचे
म्हणजे ऐनवेळी चेंज करावा वाटलं तर ते वापरता येते
याच्या अंलबजावणीवेळी गृहिणीनो.... थोडं स्ट्रिक्ट राहा त्यामुळे तुमच्याच मुलांची तब्येत सुधारेल, अशाच व्हिटॅमिनयुक्त भाज्या सुचवल्यात
आता फालतू लाड कमी करू मुलाचे, रोज एक तरी ग्रीन व्हिटॅमिन भाजी गेली पाहिजे पोटात
प्लस
सतत त्याचाही कंटाळा होऊ शकतो म्हणून अभ्यासपूर्वक त्याच्या जोडीला सुकी भाजी दिलीय जी तुम्ही टेस्टी / चमचमीत बनवू शकता !
म्हणजे मग बॅलन्स होईल !
या चार्टची प्रिंटआउट काढून घ्या आणि फ्रिजवर चिकटवून ठेवा.
त्याचा महत्वाचा फायदा हा होतो की, आदल्या दिवशीच, उद्या काय भाजी आहे, हे मुलांना कळल्याने त्यांची तशी मानसिकता आपोआप होऊ लागते
मग दुसऱ्या दिवशी कटकट नाही करत ते !
सुरुवातीला थोडे वैतागतील, पण गृहिणीनो तुम्ही फिक्स राहा!
आणखी एक पहा, रविवारी मी मिक्स व्हेजिटेबल का सुचवलं ? त्यामागे पण अभ्यास आहे
आठवडाभर ज्या भाज्या केल्या त्यातल्या एक दोन एकदोन शिल्लक राहू शकतात. एखाद वांग, एकच दोडका असं ! तर ते सगळं मिक्स करून रविवारी सगळं संपवून टाकण्यासाठीच ती "मिक्स व्हेज भाजी" (यासाठी पावभाजी मसाला किंवा सब्जी मसाला वापरला आणि हि भाजी करताना फोडणीत चमचाभर दही टाकलं तर अगदी पंजाबी स्टाईल टेस्टी भाजी होते) आणि शिल्लक अर्ध्या मुर्ध्या भाज्या पण संपतात. म्हणजे सोमवारी पुन्हा सर्व स्टोक फ्रेश भरायला तुम्ही मोकळे !
या चार्टची हि जेपीजी फाईल मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा (गॅलरी मध्ये)
म्हणजे मग मंडईत गेलात की हा चार्ट तिथं ओपन करून त्याप्रमाणे पर्चेस करता येईल
तर गृहिणीनो.... तुमच्यासाठी अभ्यासपूर्वक केलेला हा चार्ट अंमलात आणा आणि रिजल्ट चांगले मिळाले तर जरूर कळवा (आणि जमलं तर एखाद दिवशी मला जेवायला बोलवा) हीच माझी कन्स्लटिंग फी असेल !
ऑल द बेस्ट !