अर्थसंकल्पात महिलांना काय मिळालं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या महत्वाच्या घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शनिवारी अर्थसंकल्प जाहीर केला. सरकार पाच लाख महिला, एससी आणि एसटी उद्योजकांसाठी 2 कोटी रुपयांची मुदत कर्ज योजना सुरू करणार. 2025-26 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, त्या म्हणाल्या की लहान, मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी एक उत्पादन मिशन तयार केले जाईल.
महिलांसाठी करण्यात आलेल्या महत्वाच्या घोषणा :
1) दोन कोटी रुपयांचा मध्यम मुदतीचे कर्ज नव्याने लघुउद्योजक महिलांना देण्यात येणार आहे.
2) महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार
3) मागास वर्गातील महिलांसाठी नवी योजना, चामड्यांची पादत्राणे बनवणाऱ्यांसाठी ही योजना असून पाच लाख महिलांना योजनेचा लाभ होणार
4) महिलांना स्टार्टअप साठी दोन कोटी रुपयांची मदत
5) इंडिया पोस्ट महिला बँकेचे पुनरुज्जीवन करणार
6) सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना - आठ कोटीहून अधिक लहान मुलांना पोषणमूल्य मिळणार
7) स्टार्टअप्ससाठी ₹10,000कोटींची तरतूद
8) एससी/एसटी महिलांना स्टार्टअप्ससाठी कर्ज स्वरूपात मदत
9) देशभरातील एक कोटी गर्भवती आणि स्तनदा मातांना, एक लाख किशोरवयीन मुलींना पोषणमूल्य वाढवणार (आकांक्षीत जिल्हे- aspirational district) ईशान्य भारतातही विशेष लक्ष
पोषण मुल्य पुरवण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद
1) सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 कार्यक्रमांतर्गत 8 कोटी लहान मुलांना सकस अन्न पुरवणार.
2) 1 कोटी महिलांना आणि 20 लाख कुपोषित मुलींना सकस अन्न पुरवण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करणार.
3) सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन पुरवणार.
4) एससी एसटी महिलांसाठी नव्या योजनेची घोषणा करण्यात आलीय. 5 लाख महिलांना याचा लाभ होईल. यासाठी 10 हजार कोटींचा नवा निधी दिला जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं जाणार आहे. यासाठी 5 लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.