ममता बॅनर्जींच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नक्की काय?

Update: 2021-04-17 16:46 GMT

सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक सुरु आहे. या निवडणूकीदरम्यान भाजप आणि तृणमुल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे. १० एप्रिलला कूचबिहार येथे सितालकुची विधानसभा मतदान केंद्रावर झालेल्या गोळीबारात ४ लोकांचा मृत्यू झाला होता.

याच कूचबिहारमधील गोळीबाराशी संबंधित ममता बॅनर्जी यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांचा फोन टॅप करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजपवर केला आहे. तसंच या प्रकरणाची आपण केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

शुक्रवारी, भाजपाने एक कथित ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे. ज्यात ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारासोबत गोळीबारात ठार झालेल्या चार लोकांच्या प्रेत यात्रा काढण्याचे आदेश टीएमसी नेत्यांना देत आहेत. मात्र ही कथित ऑडिओ क्लिप खोटी असल्याचं ममता यांनी म्हटलं आहे.

या निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या अगोदर नंदिग्राममध्ये टीएमसी प्रमुखांशी बोलताना भाजपच्या सदस्यांची कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. तृणमूल काँग्रेसच्या प्रगतीवर आधारित प्रचाराला भाजप लढा देऊ शकत नाही आणि म्हणून ते असे कट रचत आहेत. असे कट रचणाऱ्या आणि त्यात सामील असणाऱ्यांना मी सोडणार नाही. असं ममता यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काय आहे प्रकरण?

कूचबिहार मधील सितालकुची विधानसभा मतदान केंद्रावर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार झाला होता. १० एप्रिलला झालेल्या या हिंसाचारात बॉम्ब आणि बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी CRPF च्या जवानांनी केलेल्या फायरिंगमध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला होता.

Tags:    

Similar News