गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अधिवेशनादरम्यानही अनेकांना कोरोनाचा लागण झाली होती. अशातच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना देखील कोरोनाची लागण झाली असून त्यांनी तसं ट्विट केलं आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 31, 2021
मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.
राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना मंत्री, विधीमंडळ सदस्य तसेच कर्मचाऱी अशा एकूण 52 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात आता दिवसेंदिवस वाढच पाहायला मिळत आहे. अधिवेशन सुरू असतानाच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याचवेळी विधानसभा सदस्य समीर मोघे यांच्यासह अनेक आमदार कोरोनोबाधीत झाले होते. राज्यात वाढत असलेले कोरोना रूग्ण ही चिंतेची बाब आहे. याशिवाय राज्यातील ओमायक्रॉन व्हेरीयंटची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 141 वर पोहोचली आहे.