निखिल वागळेंच्या पोस्टवर असभ्य भाषा वापरत भक्त का भडकले?

भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर मंगेशकर कुटूंबियांकडून लता मंगेशकर पुरस्काराची सुरूवात करण्यात आली आहे. हा पहिलाच पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. मंगेशकर कुटूंबियांच्या या घोषणेनंतर अनेक संमिश्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सोमवारी एक ट्विट केलं. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी टीका केली. ही टीका करताना अनेकांनी आपल्या मर्यादा ओलांडल्याचे पहायला मिळाले. अगदी खालच्या भाषेत ही ट्रोल आर्मी त्यांच्यावर तुटून पडली.

Update: 2022-04-12 08:41 GMT

पहिला लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाल्याची घोषणा मंगेशकर कुटुंबियांनी सोमवारी संध्याकाळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लतादीदींना त्यांच्या बहिणी समान मानायचे शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेल्या कामामुळे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत असल्याचं उषा मंगेशकर यांनी सांगितले. आता हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना जाहीर झाल्यानंतर समाज माध्यमांवर निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार मिळाल्यानं कौतुकाचा वर्षाव केला आहे तर अनेकांनी यावरून टीकाही केली आहे.

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सुद्धा यासंदर्भात सोमवारी संध्याकाळी एक ट्विट करत म्हटलं आहे की, "मंगेशकर कुटुंबियांनी पहिला लता मंगेशकर पुरस्कार नरेंद्र मोदींना दिला यात आश्चर्य काय? त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार!" असं वयक्तिक मत पत्रकार निखिल वागळे यांनी ट्विट केले आहे.

त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. अर्थातच त्यांच्या या मतावर टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहेच. मात्र समाज माध्यमांवर त्यांनी केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांची भाषा खुपच घसरली आहे. एखाद्याचे विचार, त्यांनी व्यक्त केलेले मत आपल्याला पटत नसेल तर विचारांचा विरोध विचारांनी व्हायला हवा. मात्र सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात विचारांचा विरोध नेहमी शिव्या-शाप देऊनच केला जातो हे काही आता नवीन नाही.

पत्रकार निखिल वागळे यांनी हे ट्विट केल्यानंतर सोपान धामणे हे रिट्विट करत म्हणतात, "निखिल वागळे तुझ्या मते तो कुणाला द्यायला हवा होता, पप्पू कि मोठे साहेब किंवा बरखा कि राजदिप कि आणखी कोणी कुत्रकार तुझ्या सारखा. जयहिंद जय श्रीराम", आता सोपान धामणे यांना जे काही म्हणायचे आहे ते सभ्य भाषेत सुद्धा सांगू शकले असते. फक्त सोपानच नाही तर त्यांच्यासारख्या अनेकांनी वागळेंवर असभ्य भाषेत टीका केली आहे.

जयश्रीराम नावाच्या एक ट्विटर वापरकर्त्याने तर वागळे यांना थेट गंजाड्या म्हटले आहे. या समाज माध्यमांवर आणखीन एक प्रकार वाढतो आहे तो म्हणजे आपलं खरं नाव लपवून कुठल्या तरी दुसऱ्या नावाने अकाऊंट तयार करायचे आणि अशा प्रकारची गरळ ओकत राहायचं. आता हेच बघा नाव रामाचं आणि भाषा अरेतुरेची.. तर हे जयश्रीराम नावाचे वापरकर्त्याने वागळेंना म्हंटले आहे की, "अरे गंजाड्या चाटूकारीता शिवाय अपेक्षा काय?", असं म्हणत हसतानाचे ईमोजी वापरले आहेत.

आता शुभम राऊत यांनी देखील भाषा बघा ते म्हणतायत, "आयुष्यभर कांग्रेसची गांड तू तुझ्या हाताने धुतली आहेस वागळे. कम्युनिस्टांनी थुकू पर्यंत दम तुला चाटायची घाई व्हायची. तुझी लायकी नाही नालायक माणसा."

श्रीकांत या ट्विटर वापरकर्त्याने तर पत्रकारांना नक्षलवादीच म्हटलं आहे ते म्हणतात, "मोदी आणि हिंदूच्या विरोधात नीचतेची पातळी कधी गाठली हे या नक्षलवादी मराठी पत्रकारांना कधी कळलेच नाही. ज्या व्यक्तीपुढे आज जग नतमस्तक होत आहे त्याला देशाची, कलेची अविरत सेवा करणार्याे मंगेशकर कुटुंबीयांनी पुरस्कार द्यायचे ठरवले तर यांना पोटशूळ उठले आहे!

तर संजय मुद्गल हिंदू साम्राज्य यांनी #बांडगुळ म्हणत वागळे याना डुक्कर म्हणत आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "डुकरा तुझ्या बुडाला का आग लागली तू तुझ्या आई च्या नावाचा पुरस्कार मायनो ला दे की आम्हाला पण नाही वाटणार आश्चर्य तुझ्या कडून दुसरी अपेक्षा च नाही #बांडगुळ.."

खरंतर आशा अनेक प्रतिक्रीया नेहमीच निखिल वागळे यांच्या टिप्पणीवर आलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. यात काय नवीन नाही. अनेकदा आशा लोकांनी तर त्यांनी आई बहीण पण काढली आहे. आता हे फक्त वागळे यांच्याबाबतच होतं अश्यातला काही भाग नाही. कोणीही आपले काही परखड विचार व्यक्त केले की हे लोक त्यांची आई बहीण काढायला लगेच पोहोचतात. आता या सोशल मिडियावरची व्यक्त होण्याची भाषा अत्यंत खालच्या स्थराला गेली आहे..आता गरज आहे ती अशा प्रकारे बेवारस नावाने ट्रोल करणाऱ्या, अनेक प्रकारची खोटी माहिती पसरवणाऱ्या ट्रोल आर्मीच्या समूळ उच्चाटनाची. समाजमाध्यमांवर बेवारस लोकांनी इतका उन्माद मांडला असून देखील आपले सायबर खाते शांत का? कोणास ठाऊक..

निखिल वागळे यांच्या अनेक पोस्टवर अशा सर्वांच्या असभ्य भाषेतील प्रतिक्रीया आहेत. यात ट्रोलर्सनी इतकी खालची भाषा वापरली आहे की त्या प्रतिक्रीया आपण याठिकाणी दाखवू देखील शकत नाही.

Tags:    

Similar News