जगभरात करोना व्हायरसने थैमान घातलं आहे. या व्हायरस च्या विळख्यात लाखोंच्या संख्येनं लोकं अडकतायेत. कुठे करोनाची दहशत तर कुठे करोना बाधित असलेल्या रुग्णांना होणारा प्रचंड त्रास... वाढत्या करोनामुळे बंद झालेला लोकांचा रोजगार... मास्क, सॅनिटाझर आता सोबती झाले असून आरोग्यव्यवस्थेवर पडणारा ताण... या महामारीच्या काळात सगळीकडे नैराश्य पसरलेलं असताना सोशल मीडियावर अमृता लँग यांनी करोना आणि सद्यस्थितीवर सुंदर अशी कविता म्हटली आहे. अमृता या स्वतः करोना विषाणूशी लढत आहे. या भयावह काळात सकारात्मक गोष्टी कानावर पडल्या की कठीण काळ ही सोप्पा होऊन जातो. असं अमृता यांच्या व्हिडिओ वर नेटिझन्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत.