विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिवसाला 2 हजार भाविकांना सोडण्याचा निर्णय

Vithal mandir committee in pandharpur allows 2 thousand devotees now

Update: 2020-11-18 01:50 GMT

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पंढरपूरचे विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने बुधवारपासून दोन हजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वबभूमीवर सरकारने घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करत दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज एक हजार भाविकांना सोडण्यात येत होते, आता दर्शनाकरिता दोन हजार भाविकांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वचभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे बंद होती. मात्र नित्योपचार दररोज सुरु होते. मंदिरात व नामदेव पायरी ते दर्शन रांगेत स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझर फवारण्यात येत आहे. दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाईल, याची खबरदारी घेण्यात येत आहे, त्याचबरोबर मंदिरात येणाऱ्या भाविकांकरीता सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर भक्तांना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

ऑनलाईन नोंदणी केलेल्या पास धारकांनाच दर्शनासाठी सोडण्यात येत असल्याने भाविकांनी http://www.vitthalrukminimandir.org/home.html या संकेत स्थळावर नोंदणी करावी, असे आवाहनहीं मंदिर समितीने केले आहे.

* भाविकांसाठी नियमावली*

* सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत 2000 भाविकांना मुख दर्शन घेता येणार

* प्रति तास 200 भाविकांना दर्शनाकरीता सोडणार

* दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी करावी.

* भाविकांनी 24 तास अगोदर ऑनलाईन बुकींग करावे, बुकींग 8 दिवसापर्यंत करता येणार

* मुख दर्शनाकरीता कासार घाट येथे पास तपासणी करुन दर्शनाला सोडणार

* कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्यांना दर्शन प्रवेश बंद

* मंदिराच्या पूर्व गेट मधून भाविक दर्शनाला आत जातील तर व्हीआयपी गेटमधून बाहेर पडतील.

* दर्शन रांगेत फिजिकल डिस्टन्स (दोन भाविकात 6 फुट अंतर) ठेवण्यासाठी जागोजागी मार्किंग करण्यात आले आहे.

* अन्नक्षेत्र व प्रसाद व्यवस्था बंद राहील

* सध्या 65 वर्षावरील नागरिक, 10 वर्षाखालील बालक, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांनी दर्शनास येणे टाळावे

Tags:    

Similar News