विराट आणि अनुष्का यांच्या मुलाचे नाव "अकाय": अर्थ आणि प्रेरणा

१५ फेब्रुवारीला अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला.जाणून घ्या ! व्हॅलेंटाईन डेच्या एका दिवसानंतर जन्मलेल्या मुलाचे नाव या सुपरस्टार जोडप्याने काय ठेवले आहे ?

Update: 2024-02-22 06:11 GMT

भारताचा सुपरस्टार खेळाडू अर्थात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे, कारण असे की, या सुपरस्टार जोडीच्या पोटी एक लिटल सुपरस्टारने जन्म घेतला आहे. १५ फेब्रुवारीला अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला. व्हॅलेंटाईन डेच्या एका दिवसानंतर जन्मलेल्या मुलाचे नाव या सुपरस्टार जोडप्याने काय ठेवले आहे. 

३ वर्षांनी हे जोडपे दुसऱ्यांदा आई बाप बनले आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या मुलाचे नावही विचारपूर्वक ठेवले आहे. त्यांच्या मुलाचे नाव अकाय असे ठेवले आहे. 'अकाय' याचा हिंदी भाषेत अर्थ 'शरीर नसलेला' असा होतो. म्हणजे ज्याचे शरीर त्याच्या आत्म्यापेक्षा कमी समजले जाते त्याला अकाय म्हणतात.

अनुष्का शर्माने आपल्या मुलाच्या नावासाठी हिंदी शब्द निवडला आहे. 'अकाय' अनेक भाषांमध्ये वापरले जाते. तुर्की भाषेतही 'अकाय' शब्द आढळतो. ज्याचा अर्थ 'चमकणारा चांद' असा होतो.

फिलिपिनो भाषेत या शब्दाचा अर्थ 'मार्गदर्शन' असाही होतो. या शब्दाचा दर्शनशास्त्राच्या दृष्टीनेही अर्थ असू शकतो. तसे या कपलने अद्याप त्याच्या नावाबद्दल कोणतेही मोठे खुलासे केलेले नाहीत.

दर्शनात अनेक महान तत्त्वज्ञान्यानी निराकाराबद्दल आपले महान तात्विक सिद्धांतही दिले आहेत. आता या नावाचा खरा अर्थ काय आहे हे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच सांगू शकतात.

२०२१ च्या जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या घरी पहिल्या बाळाचे स्वागत केले. मुलीच्या जन्मानंतर दोघांनी तिचे नाव 'वामिका' ठेवले. वामिका हे नाव देवी दुर्गाच्या नावाला पर्यायवाची नाव आहे.

आता अनुष्का शर्मा आणि विराट यांनी आपल्या मुलाचे नाव अकाय ठेवले आहे. दोघांनी जवळपास ५ दिवस ही बातमी गुप्त ठेवली होती. आता २० फेब्रुवारी रोजी दोघांनी याचा खुलासा केल्यामुळे बॉलीवूड कलाकारांनी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना दुसऱ्यांदा पालक बनण्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे तसेच शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 

Tags:    

Similar News