'पोपटपंची बंद करा पासून चित्रा वाघ म्हणतात मला' इथपर्यंत चित्रा वाघ व विद्या चव्हाण यांच्यात शाब्दिक युद्ध..

"पोपटपंची बंद करून चित्रा वाघ यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्याही वार्डातून निवडणूक लढवून दाखवावी" विद्या चव्हाण यांच्या या आव्हानाला "पुरून उरेन तुम्हाला “चित्रा वाघ” म्हणतात मला" असे चित्रा वाघ यांचे उत्तर..

Update: 2022-05-19 03:41 GMT

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोमवारी पुणे दौर्‍यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमस्थळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महागाईविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. बालगंधर्व येथे पार पडलेल्या स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तेव्हा भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्या महिलेला कानशिलात मारल्याचा प्रकार घडला. याचं प्रकारावरून भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी एक ट्विट करत या घटनेचे समर्थन केले. "कार्यक्रमासाठी नाही तर भाजपाचा कार्यक्रम उधळायला आलेल्या अंडी फेकायला आलेल्या महिलांची आरती करायची असं म्हणायचं आहे का तुम्हाला..?" असं म्हणत या घटनेचे समर्थन केले होते.

आता चित्रा वाघ यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी, काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी देखील, "अफाट लोकप्रिय असणाऱ्या "लोकनेत्या" 😄स्वतःवर व बदलेल्या पक्षावर विश्वास असेलतर पोपटपंची बंद करून चित्रा वाघ यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कुठल्याही वार्डातून निवडणूक लढवून दाखवावी!" असे आव्हान चित्रा वाघ केले आहे.

आता विद्या चव्हाण यांच्या या आव्हानाला चित्रा वाघ यांनी सुद्धा "चित्रा वाघ" म्हणतात मला" म्हणत उत्तर दिले आहे. त्यांनी एक ट्विट करत म्हटले आहे की, "मेरे सच को नागवार तेरे झूठ की गवाही है, करते रहेना छोटी बाते…यह तो 'तेरी फितरत है,

और 'तेरी हर ओछि बात का जवाब देना यह तो मेरी तौहीन है...एक गेली आता दुसरी आली….😂 काळजी नको…पुरून उरेन तुम्हाला "चित्रा वाघ" म्हणतात मला 😊

अशाप्रकारे विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्या मध्ये ही ट्विटरवर शाब्दिक युद्ध रंगल्याच पाहायला मिळत आहे.

Tags:    

Similar News