उसतोड मजुरांना महामंडळाची माहितीही नाही, लाभही नाही ; सुषमा अंधारे भडकल्या

उसतोड मजुरांना महामंडळाची माहिती नाही आणि लाभही मिळाला नाही, सुषमा अंधारे यांचा बीडमधील नेत्यांवर निशाणा;

Update: 2024-02-11 12:07 GMT

उसतोड मजुरांना महामंडळाची माहिती नाही आणि लाभही मिळाला नाही, सुषमा अंधारे यांचा बीडमधील नेत्यांवर निशाणाव ...! शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.. हा दौरा करत असताना त्यांनी बीड जिल्ह्यातील शेतकरी आणि ऊसतोड कामगारांशी संवाद साधलाय, यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील दिग्गज नेते आणि ऊसतोड कामगारांच्या नेत्यांवर देखील टीका करत सवाल उपस्थित केला आहे..

यावेळी त्या म्हणाल्या, की मी सध्या राज्यभराचा दौरा करतेय, या दौऱ्यादरम्यान शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न समोर येत आहेत. बीडमध्ये आले असता मी ऊसतोड कामगारांशी संवाद साधला, यावेळी लक्षात आले की ऊसतोड कामगारांना ऊसतोड कामगार महामंडळाची माहिती नाही. एकीकडे बीडमधील नेते या ऊसतोड कामगारांच्या जीवावर राजकारण करतात, त्यांच्या महामंडळासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आल्याचे सांगतात. परंतु प्रत्यक्षात या महामंडळाच्या माध्यमातून कुठल्याही योजना राबवल्या नसल्याचे आता समोर येत आहे. असे असेल तर महामंडळाची घोषणा करून राज्य सरकारने काय साध्य केले ? असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. या महामंडळाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरजही सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली

Tags:    

Similar News