महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम राज्याच्या घराघरात पोहोचलाय. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात या कार्यक्रमाचे आणि त्यातीव सर्व कलाकारांचे चाहते पहायला मिळत आहेत. या कार्यक्रमाची सुत्रसंचालिका प्राजक्ता माळी हि सोशल मिडीयावर सक्रीय असते. तिच्या सोशल मिडीया अकाउंट्सवरून ती नेहमी तिचे फोटो किंवा व्हिडीओज अपलोड करत असते. नुकताच तिने तिचा एक फोटो फेसबुकवर अपलोड केला आणि सोबतट दिवंगत कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेच्या काही ओळीसुध्दा टाकल्या पण खाली शांता शेळके यांचं नाव टाकताना तिने शांता शेळके यांचं नाव शांती शेळके असं टाकलं. या वरून तिला नेटकऱ्यांनी चांगलच धारेवर धरलं आहे. तिने तिच्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे., "थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा..ऋतू हिरवा, ऋतू बरवा… -शांती शेळके." बरं तिने अजूनही तीची चुक सुधारली नाहीये.
मनिष गायकवाड या वापरकर्त्याने लिहिलंय की, "चल प्राजु आपण दोघं पळुन जाऊ, पण साडीसोबत ब्लाउज घ्यायला विसरू नको" या वापरकर्त्याने प्राजक्ताला तिच्या मागील नो ब्लाउज लुकवरून प्रतिक्रीया दिली आहे.
अनिल शिरसाठ यांनी, "भोंग्यांच्या गोंगाटावर राज सभा भरवा... राज्यपाल हस्ते पुरस्कार मिळे मनाला गारवा...
--प्राजक्ती माळी.", असं म्हणत प्राजक्ता माळीवर टीका केली आहे. काही दिवसांपुर्वी प्राजक्ता माळीने राज ठाकरेंच्या समर्थनार्थ पोस्ट टाकली होती त्यावरून टीका केली आहे.
रमेश खरे यांनी तर, "कवियत्रीच नाव शांताबाई शेळके असे आहे. जरा आदर दाखवावा.", असं म्हणत चुक सुधारण्याची विनंती केली आहे.
सुधीर पाटील यांनी, "शांताबाई शेळके असं हाय त्ये, शांती शेळके तुमच्या वर्गातली असेल !!", असं म्हणत प्राजक्ताला तिची चुक दाखवून दिली आहे.
संजयदास गायकवाड यांनी टीका करताना म्हटलंय, "भोंग्याचा गोंगाट हिच्या मस्तकात ईतका भिनलाय कि सुप्रसिद्ध कवयत्री चे नाव सुद्धा विसरली.. या असल्या चुका चुकून होत नसतात. हे एक विक्रुत षडयंत्र.."
वैभव तुपे यांनी प्रतिक्रीया देताना म्हटलंय की, "नाव माहित नसेल तर लिहिण्याआधी कुणाकडून तरी खात्री करून घ्यावी. चुकीचे नाव लिहून त्यांचा अवमान करू नका."
अशा अनेक वापरकर्त्यांनी प्राजक्ताला तिची चुक सुधारायला सांगितली आहे. हे जरी असलं तरी प्राजक्ता माळी कडून इतक्या मोठ्या कवयित्रीचं नाव चुकीचं लिहिणं ही फार मोठी चुक सध्याच्या घडीला समजली जातेय.