दलित डिलिव्हरी बॉयच्या चेहऱ्यावर थुंकून त्याला मारहाण , उर्मिला मातोंडकर संतापल्या...
शनिवारी रात्री लखनऊमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय कडून तो दलित असल्याने सवर्ण जातीच्या ग्राहकाने जेवण घेण्यास नकार देत त्याला मारहाण केली आणि त्याच्या तोंडावर थुंकल्याचा प्रकार घडला. या प्रकरणावर देशभरातून टीका होते आहे. अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी देखील ट्विट करत या घटनेबद्दल निषेध नोंदवला आहे आणि संबंधित आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे.
काय म्हणाल्या उर्मिला मातोंडकर?
लखनऊमध्ये सवर्ण जातीच्या ग्राहकाने दलित असलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या हातून जेवण घेण्यास नकार दिला, त्याच्या तोंडावर ग्राहक थुंकले मग शिवीगाळी करून त्याला मारहाण केली. या प्रकरणाची बातमी सगळीकडे पसरली. दैनिक भास्कर ने छापलेल्या बातमी चा फोटो पोस्ट करत अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला. त्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, "खूपच लज्जास्पद आणि वेदनादायक.... आपल्या देशाची सर्वात मोठी कमतरता आणि आव्हान म्हणजे जातिवाद वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही आपण ते नष्ट करू शकलो नाही तर दुसरं काय साध्य होणार? देशाला अधोगती देणाऱ्या अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी", असं म्हणत त्यांनी या घटनेतील संबंधित आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे ते तपशील पाहू द्या
बेहद शर्मनाक और दर्दनाक..
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) June 20, 2022
हमारे देश की सबसे बड़ी ख़ामी और चुनौती जातिवाद हैं। बरसों के प्रयासों के बावजूद अगर इसे नहीं मिटा पायें तो बाक़ी उपलब्धियाँ किस कामकी?देश का पतन करनेवाले ऐसे लोगों पर कड़ी कार्रवाई हो।#समानता #बंधुता pic.twitter.com/D3r4xHkxHo
काय आहे हे प्रकरण?
लखनऊमध्ये शनिवारी रात्री झोमॅटो डिलिव्हरी बॉय च्या हातून जेवण घेण्यास ग्राहकांना नकार दिला कारण डिलिव्हरी बॉय हा दलित होता. फक्त इतकंच नाही तर या ग्राहकाच्या कुटुंबियांनी मिळून त्या डिलिव्हरी बॉय ला मारहाण केली आणि तरीही मन भरलं नाही म्हणून त्याच्या तोंडावर थुंकलं ही पूर्ण घटना आशियाना विभागातली आहे. पीडित मुलाच्या तक्रारीवर पोलिसांनी २ ज्ञात आणि १२ अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की हे प्रकरण फक्त मारहाणीचा आहे
नेमकं काय घडलं होतं
आशियाना विभागातील विनीत रावत हा झोमॅटो डिलिव्हरी बॉय आहे. शनिवारी रात्री त्याला कंपनी ने अजय सिंग नावाच्या ग्राहकाकडे डिलिव्हरी देण्यासाठी पाठवलं. विनीतने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की जसं त्याने अजय सिंह यांना स्वतःचं नाव सांगितलं असे ते भडकले आणि त्यांनी विनीत रावत यांना शिवीगाळ करत आता आम्ही तुम्ही शिवलेलं सामान घेणार का असे म्हणाले, यावर विनीत त्यांना म्हणाला की जर आपल्याला जेवण घ्यायचं नसेल तर रद्द करा पण शिव्या देऊ नका.
यावर ग्राहकाने त्याच्या हातातील जेवणाचा पाकीट फेकून दिलं आणि त्याच्या तोंडावर तंबाखू थुंकली आणि जेव्हा विनितने विरोध केला तेव्हा अजय आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांकडून विनीतला दांडक्याने मारहाण करण्यात आली विनीतने कसाबसा तिथून पळाला आणि थेट त्यांना पोलीस स्टेशन गाठलं.
तर आशियाना विभागातील पोलीस अधिकारी दीपक पांडे यांचे म्हणणे आहे की, आरोपी अजय यांच्या म्हणण्यानुसार ते घरातून त्यांच्या मित्राला सोडण्यासाठी निघाले होते, तेव्हाच विनीत यांनी त्यांना पत्ता विचारला. अजय पान खात होते आणि विनीतला पत्ता सांगण्यासाठी त्यांनी त्यांच्या तोंडातील पानमसाला थुंकला तेव्हा काहीसा फवारा विनीत वर उडाला. यावर विनीत ने शिवी देत वादाला सुरुवात केली आणि म्हणून अजय आणि त्याच्या घरच्यांनी विनीतला मारहाण केली.