उल्का महाजन यांनी का नाकारला एबीपी माझाचा पुरस्कार?

Update: 2022-07-20 02:45 GMT

एबीपी माझाच्या वतीने देण्यात येणारा ABP माझा सन्मान पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना जाहीर झाला होता.

सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना एबीपी माझाच्या वतीने देण्यात येणारा माझा सन्मान पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र उल्का महाजन यांनी एबीपी माझा सन्मान पुरस्कार अत्यंत महत्वपुर्ण कारण देऊन नाकारला आहे.

उल्का महाजन यांनी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना पत्र लिहून म्हटले आहे की, एबीपी माझाने माझी निवड माझा सन्मान या पुरस्कारासाठी केली होती. तर या पुरस्काराचे वितरण १ जुलैला होणार होते. मात्र राज्यातील राजकीय घडामोडींमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता हा पुरस्कार ३ ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे. तर हा पुरस्कार राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे. त्यामुळे ज्या पध्दतीने मतदारांचा, लोकशाहीचा व संविधानाचा मान न राखता सध्याचे सरकार भ्रष्टाचाराच्या मार्गाने सत्तेवर आले आहे. त्यामुळे या व्यक्ती संविधानिक पदावर असल्या तरी त्यांच्या हस्ते सन्मान स्वीकारणे हे माझ्या सद्सद्विवेक बुध्दीला पटणारे नाही. त्यामुळे विनम्रपणे मी हा पुरस्कार नाकारत असल्याचे उल्का महाजन यांनी पत्र लिहून एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना सांगितले.

तसेच उल्का महाजन यांनी अगदी विनम्रपणे एबीपी माझाचा माझा सन्मान हा पुरस्कार नाकारल्याने ज्येष्ठ बँकींग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Tags:    

Similar News