ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. बुधवारी ब्रिटनमध्ये कोरोनाचे 78 हजार 610 नवीन रुग्ण आढळले. ओमिक्रॉन हा नवीन व्हेरीयंट मोठ्या प्रमाणावर पसरत असताना ब्रिटन मध्ये बुधवारी आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना केसेस आढळल्या आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात दुसऱ्या लाटेत एका दिवसात सुमारे ६८ हजार रुग्णांची नोंद झाली होती.
ब्रिटनमध्ये 11 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाचा फटका बसला आहे, तर तिथली एकूण लोकसंख्या 6.70 कोटी इतकी आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ओमिक्रॉन हा प्रकार अत्यंत धोकादायक असून यामुळे गंबरीर परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा दिला आहे. कारण ब्रिटन हा एकमेव देश आहे की ज्या ठिकाणी ओमिक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेतही कोरोनाची भीतीदायक नवीन प्रकरणे समोर आली आहेत
दक्षिण आफ्रिकेतही कोरोनाची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. बुधवारी एकाच दिवसात 26 हजार 976 रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी, जुलैमध्ये तिसऱ्या लाटेदरम्यान 26 हजार 485 बाधित आढळले होते. दक्षिण आफ्रिकेतच कोरोनाचा एक नवीन प्रकार ओमिक्रोन प्रथमच सापडला आहे. नवीन प्रकार वेगाने पसरत आहे. आतापर्यंत ते 75 पेक्षा अधिक देशांमध्ये पोहोचले आहे.