शहापूर व वाडा तालुक्यात दोन बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश मिळालं आहे. शहापूरातील आश्रम शाळेत इयत्ता 8/9 मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुला मुलींचे वाडा तालुक्यातील चेंदवणी येथे होणार असल्याची माहिती शहापूर च्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांना मिळाली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार सूर्यवंशी यांनी शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलामुलीचे लग्न थांबवले पाहिजे. यासाठी थोडा ही विलंब न करता तहसीलदारांनी स्थानिक तलाठी घागस, पोलीस पाटील , समाजसेवक सुभाष मोडक, शहापूर तहसील कार्यालयाचे भूषण जाधव यांना विवाहस्थळी आघई गोरलेपाडा येथे पाठवले, तिथे सर्व टीम पोहोचल्यावर त्यांनी मुलीच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन समज देत विवाह थांबवण्याची विनंती केली.
गांडूळवाड आश्रमशाळा शहापूर येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तहसीलदार सूर्यवंशी यांनी अल्पवयीन मुलीचे नातेवाईक यांच्याशी मोबाईल वर संभाषण करीत चर्चा केली. या चर्चे दरम्यान च्या समुपदेशने मुलीचे वडील, मामा यांच्या सह सर्वच वऱ्हाडी भावुक झाले. जुळलेला विवाह पुढच्या तारखेला करण्याचे कबूल करत तहसीलदार व प्रशासनाचे आभार मानले.
तर दुसरा विवाह शहापूर गोठेघर येथील 17 वर्षीय मुलाचा विवाह जव्हार तालुक्यातील तिलोंदा येथे होणार होते. या प्रकरणी तहसीलदार शहापूर यांनी वाडा, जव्हार येथील वरिष्ठ अधिकारी व शहापूर गोठेघर आश्रम शाळेतील मुख्याध्यापक यांना संपर्क करून सदर बालविवाह रोखण्यात यश मिळवले. वाडा, जव्हार तालुक्यातील प्रशासन विवाह स्थळी गेले व विवाह थांबवला .
आजच्या कारवाईत तहसीलदार शहापूर यांनी शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलां मुलीं चे बालविवाह रोखण्यात यश मिळवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
शहापूर, वाडा, जव्हार, मोखाडा, मुरबाड सारख्या बहुतांश अतिदुर्गम भागात बालविवाह केले जात आहेत. मुलगी 12 ते 14 वर्षाची झाली की तिचा विवाह केला जातो त्या वेळी मुलगा ही 15 ते 17 वर्षा आतील असतो .परिणामी बालविवाह झाल्या मुळे कुपोषण, माता मृत्यू सारखे प्रकार ह्या तालुक्यात पाहावयास मिळत आहेत. पयासाठी समाजाच्या नेत्यांनी पुढाकार घेत समाजप्रबोधन करून बालविवाह विरोधात चळवळ उभारणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.